इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

कृषि विभागाची पुनर्रचना करण्याचा विचार : विखे-पाटील


          कोल्हापूर दि. २२ :  बदलत्या परिस्थितीत राज्यातील कृषि क्षेत्र आणि विभागासमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्याच्या कृषि विभागात काही बदल करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने कृषि विभागाची पुनर्रचना करण्याचा राज्य शासन विचार करीत आहे, अशी माहिती कृषि आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिली.
      महाराष्ट्र राज्य कृषि पर्यवेक्षक संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते. येथील शाहू सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कृषि राज्यमंत्री गुलाबराव देवकर,गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषि आयुक्त प्रभाकर देशमुख, महाराष्ट्र राज्य कृषि पर्यवेक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस विजय तपाडकर, अतुल जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
      श्री. विखे-पाटील म्हणाले, कृषि विभागाची व्याप्ती वाढत आणि बदलत चालली आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे कृषि विभागात काही बदल अपेक्षित आहेत. हे बदल काय असायला हवेत याचा अभ्यास सुरु आहे. कृषि पर्यवेक्षकाची कृषि विकासात अतिशय महत्वाची भूमिका आहे. त्यांच्यावर कृषि विकासाचा दर वाढवण्याची जबाबदारी असून त्यासाठी पर्यवेक्षकांनी प्रयत्न करायला हवेत, असे सांगून कृषीमंत्री म्हणाले, राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास कसा होईल, याचा विचार प्राधान्याने करावा. विद्यापीठात होणार्‍या संशोधनाचा आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यत कितपत पोहोचवू शकतो याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
      गैरकृषी विषयक कामे लावली जाऊ नये, अशा कृषी पर्यवेक्षकांच्या मागणीचा उल्लेख करुन कृषी मंत्री म्हणाले, गैरकृषी काम फक्त कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनाच लादली जातात, अशी तक्रार आहे. याबाबत मुख्य सचिवांशी चर्चा करुन सर्व जिल्हाधिकार्‍यांना तशा आशयाच्या सूचना दिल्या जातील. यासाठी प्रयत्न करु. कृषी विभागात ५८७ पदांची भरती करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. ही भरती पारदर्शी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत
    कृषि राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले , कृषि  विभागाकडून शेतकर्‍यांना मोठया अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यात पर्यवेक्षकांवर मोठी जबाबदारी आहे. चांगल काम करणार्‍या अधिकार्‍यांचा गौरव करणं आवश्यक असून त्यादृष्टीने प्रयत्न केला जाईल. कृषी पर्यवेक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शेतीसाठीचा राज्याचा मास्टर प्लॅन बनवता येऊ शकेल का यादृष्टीने विचार व्हावा असे सांगितले.बदलते हवामान आणि वाढती लोकसंख्या यामुळे भविष्यात आपल्यासमोर अन्न सुरक्षेचे आव्हान उभे टाकणार आहे. याबाबींचा कृषी पर्यवेक्षक आणि सर्व संबंधितांनी विचार करायला हवा.
      यावेळी कृषि आयुक्त प्रभाकर देशमुख, अतुल जाधव, संजय पाटील. विजय तपाडकर यांची भाषणे झाली. स्वाती शिंदे-पवार यांनी सूत्रसंचलन केले.

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११

मंडलिक कारखान्याच्या गळीत हंगामाचा मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

         कोल्हापूर दि. २१ : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या बाराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज झाला.
      कागल तालुक्यातील हमिदवाडा-कौलगे येथे असलेल्या या कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज शुभारंभ झाला.
      यावेळी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार जयवंतराव आवळे, आमदार रमेश बागवे, आमदार महादेवराव महाडिक आदी उपस्थित होते.

गतीमान प्रशासनासाठी शासन कटिबध्द - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण


कोल्हापूर दि. २१ : गतीमान प्रशासन ही काळाजी गरज आहे. सामान्य माणसाला केंद्गबिंदू मानून तत्त्पर,  सुलभ व पारदर्शी प्रशासनाचा लाभ देण्यासाठी सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून शासन प्रयत्नशिल आहे.गतीमान प्रशासन देण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये माहिती  तंत्रज्ञानाचा पर्याप्त वापर करण्यात येत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी संबंध महाराष्ट्रातील भूमी पुनर्मोजणी करण्याचा सुमारे ५ हजार कोटींपेक्षाही अधिक गुंतवणुकीचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून यामध्ये उपग्रहाद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याने सातबारा वरील नोंदीमध्ये अचूकता येईल असे सांगितले.
आमदार सा. रे. पाटील यांच्या प्रयत्नातून शिरोळ येथे सुमारे ६ कोटी रुपये खर्चाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील होते. तर वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज पाटील,              आमदार सा.रे.पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा यशोदा कोळी, उपाध्यक्ष धैर्यशील माने, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष सदाशिव पोपळकर, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
      सामान्य माणसाला स्वच्छ, पारदर्शी व गतीमान प्रशासन देण्यासाठी शासनाने शासकीय कार्यालयीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता, कार्यपद्धतीचे सुलभीकरण, ई-गव्हर्नन्स आदी मुद्यांवर लक्ष केंद्गीत केले आहे, असे सांगून ना. चव्हाण यांनी नाविण्यपूर्ण योजना राबविणार्‍या अधिकार्‍यांना प्रोत्साहनही देण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी जातवार जनगणना कार्यक्रमात सर्व जनतेने संपूर्ण सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्या सुरु असलेल्या योजनांचे पुनर्विलोकन करुन त्यामध्ये सुधारण करण्याची गरज व्यक्त करुन जुन्या आणि नवीन योजनांच्या अंमलबजावणीच्या सनियंत्रण व्यवस्थेमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले.
      राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा  राज्यातील सुमारे १० कोटी जनतेला लाभ मिळणार असल्याचे सांगून ना. चव्हाण यांनी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेखाली १ लाख रुपयांपर्यन्त पीक कर्जाची व्याजासह मुदतीत परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना आता कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही असा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगितले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानामुळे लोकांना विविध प्रकारचे दाखले ऑनलाईन मिळणार आहेत. गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण झालेले आणि बंद झालेले पाणंद रस्ते, शेत रस्ते मोकळे होतील. त्याचप्रमाणे जनतेला मंडल पातळीवर एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी समाधान योजना महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विकासाच्या उपक्रमांमध्ये कोल्हापूर जिल्हा सातत्याने आघाडी घेत असल्याचे सांगितले. त्यानी आमदार. सा. रे. पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करुन जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या विविध विकास कामांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी त्यांनी मिशन गोल्ड योजना, नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत राबविण्यात येणारी महिला भवन योजना, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरु करण्यात आलेली स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक केंद्ग, आय. ए. एस.च्या ट्रेनिंगसाठी कोल्हापूर येथे उभारण्यात आलेली इमारत, बाबूराव पेंटर स्मृती अकादमीसाठी शासनाने मंजूर केलेले १५ कोटींचा निधी आदीबाबत माहिती दिली.
डॉ. पतंगराव कदम यांनी आमदार सा. रे. पाटील यांचे सहकार चळवळीला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले. महसूल मंत्री श्री. थोरात यांनी शिरोळ येथे होणार्‍या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमुळे  सामान्य माणसाला पारदर्शी, सुलभ आणि तत्पर सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी राजस्व अभियानांतर्गत राज्यात फेरफार आदालतींचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याने यापुढे सातबारा अद्ययावत राहतील असे सांगितले.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शिरोळ तालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास शासन प्राधान्य  देईल असे सांगितले.
यावेळी शिरोळ तहसिल कार्यालयाला मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच राजस्व अभियानांतर्गत विविध योजनांच्या धनादेशाचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन                श्री. तुषार ठोंबरे यांनी केले तर आभार तहसिलदार डॉ. संपत खिलारे यांनी मानले. कार्यक्रमास विविध संस्थाचे मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.



मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कोल्हापूर विमानतळावर उत्स्फूर्त स्वागत


कोल्हापूर दि. २१ : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे एक दिवसाच्या कोल्हापूर दोैर्‍यासाठी आज सकाळी १०.१५ वाजता कोल्हापूर येथील विमानतळावर शासकीय विमानाने आगमन झाले. यावेळी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.  त्यांच्या समवेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, वन मंत्री पतंगराव कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार माणिकराव ठाकरे यांचेही आगमन झाले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विमानतळावर खासदार सदाशिवराव मंडलिक, महापौर वंदना बुचडे, आमदार महादेवराव महाडीक, गोकुळ दुध संधाचे अध्यक्ष अरुण डोंगळे आदी मान्यवरांनी स्वागत केले.
यावेळी  विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील तसेच वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात कुष्ठरोग शिबीर संपन्न

कोल्हापूर दि. १९ : कसबा बावडा सेवा रुग्णालय येथे उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर डॉ. आर.एस.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठरोग पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबीराचे दि. १७ ऑक्टोबर २०११ रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्‌घाटन आरोग्य सेवा (वैद्यकीय), कोल्हापूरचे डॉ. पी.एस.पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबीरात सांगली येथील भारती विद्यापीठाचे अस्थीरोग तज्ञ डॉ. नागेश नाईक यांनी सर्व कुष्ठरुग्णांची तपासणी केली असून यामध्ये एकूण ४१ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैक्‌ी २० कुष्ठरुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.  या शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीराचे डॉ. एल.एस.पाटील , डॉ. व्ही. एस. पाटील यांचे सहकार्य लाभले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. एस.बी. पाटील, डॉ. ए.एस. यादव व सर्व रुग्णालयातील कर्मचारी व सर्व कुष्ठरोग तंत्रज्ञ यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिबीराला शहरातील व  ग्रामीण भागातील कुष्ठरोग रुग्ण मोठया संख्येने हजर होते.

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०११

२१ ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिनाचे आयोजन

         कोल्हापूर दि. १७ :  लडाख येथे २० ऑक्टोबर १९५९ रोजी केंद्गीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान हरवले होते. त्यांचा शोध घेण्याकरिता आयटीबीपी आणि केंद्गीय राखीव पोलीस दलाच्या २२ जवानांची एक तुकडी २१ ऑक्टोबर रोजी गेली होती. या तुकडीवर हॉट स्प्रिंग ठिकाणी चिनी सैनिकांनी अचानक शस्त्रानिशी जोरदार केलेल्या हल्ल्यात १० जवान मृत्यूमुखी, ५ जवान जखमी झाले तर ७ जवानांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले. चिनी सैनिकांबरोबर निकराची लढत देताना या शुरवीरांनी देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले, तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा दिवस देशांतील विविध पोलीस दलाच्यावतीने पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो.
      कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने २१ ऑक्टोबर २०११ रोजी सकाळी ८ वाजता कोल्हापुरातील पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा येथे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या उपस्थितीत पोलीस स्मृती दिन पाळण्यात येणार आहे.
पोलीस स्मृती दिनाचे दिवशी एकाचवेळी  देशातील सर्व पोलीस मुख्यालयांच्या ठिकाणी दि. १ सप्टेंबर २०१० ते ३१ ऑगस्ट २०११ या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
पोलीस स्मृतीदिन समारंभास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे पोलीस अधिक्षक विजयसिंह जाधव यांनी कळविले आहे.

आणखी बारा पोलिस स्थानके उभारण्याचा प्रस्ताव - गृहराज्यमंत्री


कोल्हापूर दि. १६ : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी १२ पोलिस स्थानके उभी करण्याचा प्रस्ताव आहे ,अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गोकूळ शिरगाव एम. आय. डी .सी. पोलिस स्थानकाचे त्यांच्या हस्ते आज उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरच्या महापौर वंदना बुचडे, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार चंद्गकांत पाटील, उपमहापौर प्रकाश पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हा पोलिस अधिक्षक विजयसिंह जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक संजय येनपुरे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रवींद्ग खेबुडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, (गोकूळ शिरगाव औद्योगिक वसाहतीचा विस्तार वाढत आहे, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचीही प्रगती झपाट्याने होत आहे.या पार्श्वभूमीवर येथे शांतता आणि सुव्यवस्था असायला हवी. या दृष्टीकोनातूनच पोलिस स्थानक उभारण्यात आले आहे.(
पोलिस दलाचे आधुनिकीकरण करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. शहरात सीसीटीव्ही उभारुन सुरक्षितता अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गुन्हे सिध्द घेण्याचा दर वाढविण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलिस अधिक्षक विजयसिंह जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्य, आणि पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी  इत्यादी उपस्थित होते.

रविवार, १६ ऑक्टोबर, २०११

इचलकरंजीला रेल्वेने जोडण्यास पाठपुरावा करु : देशमुख


कोल्हापूर दि. १६ : इचलकरंजी शहराला रेल्वेच्या मार्गावर आणण्यासाठी आपण रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करु, अशी ग्वाही केंद्गीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी आज दिली.
इचलकरंजी नगरपरिषदेच्या नविन प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याचा उद्‌घाटन समारंभ आज श्री. देशमुख यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार जयवंतराव आवळे, खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष मेघा चाळके, वस्त्रोद्योग महासंधाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार पी.एन. पाटील, संजय घाटगे आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, इचलकरंजी शहराचा विकास गतीने होत आहे. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाचा विकास आणखी गतीने व्हायचा असेल आणि येथील मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्यासाठी इचलकरंजी शहराचा इतर शहराशी दळवळणाच्या सुविधा वाढायला हव्यात. त्यासाठी इचलकरंजी रेल्वे मार्गावर आणण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. सध्या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने ५० टक्के निधी दिल्यास त्या कालाला प्राधान्य दिले जाते. इचलकरंजी रेल्वे मार्गावर येण्यासाठी राज्य शासनाकडेही  निधीसाठी प्रयत्न करु. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाबाबत संशोधन करणारे केंद्गाबाबतही आपण विचार करु असे त्यांनी सांगितले. पंचगंगा नदी शुध्दीकरणासाठी केंद्गीय स्तरावरुन जी लागेल ती मदत देण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाहीही श्री. देशमुख यांनी दिली.
यावेळी खासदार जयवंतराव आवळे, खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार निवेदिता माने यांची भाषणे झाली. नगराध्यक्षा मेघा चाळके यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी इचलकरंजी नगरपरिषेने केलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी इचलकरंजीचे प्रांताधिकारी तुषार ठोंबरे , नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन देसाई आदी उपस्थित होते.

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

केंद्गीय विज्ञान तंत्रज्ञान व भूविज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

कोल्हापूर दि. १५ : केंद्गीय विज्ञान तंत्रज्ञान व भूविज्ञान मंत्री विलासराव देशमुख १६ ऑक्टोबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. १६ ऑक्टोबर २०११ रोजी मुंबईहून खाजगी विमानाने सकाळी ९ वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. ९-३० वाजता कोल्हापूरहून इचलकरंजीकडे प्रयाण. १० वा. इचलकरंजी येथे आगमन. ११ वाजता इचलकरंजी नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ वाजता राखीव. २ वाजता राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थिती. ३-३० वाजता इचलकरंजीहून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. ४ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व खाजगी विमानाने लातूरकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

रद्द व निलंबित मोटार ड्रायव्हिंग स्कूल्समध्ये वाहन चालक प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेऊ नये

        कोल्हापूर दि. १५ : कोल्हापूर विभागात १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०११ या कालावधीत मोटार ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रत्येक स्कूलला गुणवत्ता दर्जा देण्यात आलेला असून कोल्हापूर विभाग अ गुणवत्ता दर्जा प्राप्त तसेच रद्द व निलंबित करण्यात आलेल्या स्कूलची नावे पुढीलप्रमाणे आहेत. वाहन चालक प्रशिक्षणार्थींनी रद्द केलेल्या तसेच निलंबित केलेल्या स्कूल्समधून प्रशिक्षण घेऊ नये असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
कोल्हापूर विभागात अ गुणवत्ता दर्जा प्राप्त झालेल्या स्कूलची नावे पुढीलप्रमाणे -
कोल्हापूर जिल्हा - घाडगे पाटील ट्रान्स्पोर्ट प्रा. लि. कोल्हापूर, आय. टी. आय. कळंबा रोड, कोल्हापूर, बाळकृष्ण मोटार ड्रायव्हिंग स्कूल, कोल्हापूर, ओम मोटार ड्रायव्हिंग स्कूल, इचलकरंजी, जि. कोल्हापूर. सांगली जिल्हा - सुयश मोटार ड्रायव्हिंग स्कूल, आटपाडी, जि. सांगली, सातारा जिल्हा - मेट्रो ड्रायव्हिंग स्कूल, कराड, श्री मोटर ड्रायव्हिंग स्कूल पाटण, पोरे मोटर ड्रायव्हिंग स्कूल, सातारा, पोवार मोटर ड्रायव्हिंग स्कूल, गोवारी, ओमकार मोटर ड्रायव्हिंग स्कूल, बिडणी, ता. फलटण, गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल, सदर बाजार, सातारा, श्री मोटर ड्रायव्हिंग स्कूल, मलकापूर, श्री मोटर ड्रायव्हिंग स्कूल, उंब्रज, ता. कराड.
कोल्हापूर विभागातील रद्द झालेल्या स्कूलची नांवे पुढीलप्रमाणे - कोल्हापूर जिल्हा - १) सचिन ऑटोरिक्षा ट्रेनिंग स्कूल, साई कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर, २) शिवशक्ती मोटार ड्रायव्हिंग स्कूल, स्वस्तिक प्लाझा, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. ३) श्री गुरुदत्त मोटार ड्रायव्हिंग स्कूल, १३१० गांधीनगर, ता. करवीर, ४) अवधूत मोटार ट्रेनिंग स्कूल, ८७५/१५, रमणमळा, कोल्हापूर, ५) सारथी मोटार ट्रेनिंग स्कूल, २६०८/६ बी, पवार उद्योग, गोखले कॉलेज रोड, कोल्हापूर, ६) ओम साई मोटार ट्रेनिंग स्कूल, लक्ष्मीपुरी, दसरा चौक, कोल्हापूर, ७) क्लासिक मोटार ड्रायव्हिंग स्कूल, ९९४ सी, भोई गल्ली, कोल्हापूर, ८) बालाजी मोटार ड्रायव्हिंग स्कूल, प्लॉट नं. ७, दिपसेवक हौसिंग सोसायटी, आर. के. नगर, कोल्हापूर, ९) जे. डी. मोटार ड्रायव्हिंग स्कूल, सुभाषनगर, कोल्हापूर, १०) एस. बी. मोटार ट्रेनिंग स्कूल, १० निकम पार्क, देवकर पाणंद, कोल्हापूर, ११) आर. बी. मोटार ड्रायव्हिंग स्कूल, ६५७, गाळा नं. सी. ७, वाय. पी. पोवार नगर, कोल्हापूर. १२) इन्व्हीटेशन ३६५ मोटार ट्रेनिंग स्कूल, शॉप नं. १, रंजना अपार्टमेंट, १३ वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर, १३) स्वरुप कार ट्रेनिंग स्कूल, ब्लॉक नं. ९, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर, १४) श्री विमलेश्वर मोटार ट्रेनिंग स्कूल, सिध्दाई, ९६/२, ए वॉर्ड, दुधाळी, कोल्हापूर, १५) भक्ती मोटार ट्रेनिंग स्कूल, साई कॉलनी, पाचगांव, कोल्हापूर, १६) पब्लिक मोटार ट्रेनिंग स्कूल, बी २, २६०/४/एस. डफळे कंपाऊंड, ताराबाई पार्क, कोल्हापूर, १७) रविराज मोटार ट्रेनिंग स्कूल, २१०० के, १५०/२ महाडिक वसाहत, कोल्हापूर, १८) सोनी मोटार ड्रायव्हिंग स्कूल, वेताळपेठ, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, १९) न्यू क्लासिक मोटार ड्रायव्हिंग स्कूल, ६०६८, ब्लॉक नं. बी ७, स्टेशन रोड, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, २०) श्री शांती मोटार ड्रायव्हिंग स्कूल, वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, २१) संदीप मोटार ड्रायव्हिंग स्कूल, कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, २२) बारदसकर मोटार ड्रायव्हिंग स्कूल, अत्याळ, ता. गडहिंग्लल, जि. कोल्हापूर, २३) श्री सायबर मोटार ड्रायव्हिंग स्कूल, भोपळे गल्ली, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर. २४) सागर मोटार ड्रायव्हिंग स्कूल, मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर.
 सांगली जिल्हा - १)  जयहिंद मोटार ट्रेनिंग स्कूल, शिराळा, जि. सांगली, २) ओम शक्ती मोटार ट्रेनिंग स्कूल, जुना कुपवाड रोड, सांगली.
सातारा जिल्हा - १) ओम साई मोटार ट्रेनिंग स्कूल, सदर बाजार, सातारा, २) मॉडर्न मोटार ट्रेनिंग स्कूल, महाबळेश्वर, जि. सातारा, ३) चव्हाण मोटार ड्रायव्हिंग स्कूल, शनिवार पेठ, कराड, जि. सातारा, ४) चाबुकस्वार मोटार ड्रायव्हिंग स्कूल, दर्गापेठ, सातारा, ५) चैतन्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल, दहिवडी, ता. माण, जि. सातारा, ६) परफेक्ट मोटार ट्रेनिंग स्कूल, लक्ष्मीनगर, फलटण, जि. सातारा, ७) चक्रधर मोटार ड्रायव्हिंग स्कूल, शिवडे, जि. सातारा, ८) बावळेकर मोटार ट्रेनिंग स्कूल, वेन्ना चौक, मेठा, ता. जावळी, जि. सातारा.
कोल्हापूर विभागातील निलंबित केलेल्या स्कूलची नावे पुढीलप्रमाणे - कोल्हापूर जिल्हा - श्री मोटार ट्रेनिंग स्कूल, ब्रँच नं. २, गांधी कॅम्प, इचलकरंजी, ता. हातकणंगले २) यश मोटर्स ड्रायव्हिंग स्कूल, २१/९४७, स्वामी अपार्टमेंट, जवाहरनगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, ३) श्री साई मोटार ड्रायव्हिंग स्कूल, डॉ. राजेंद्ग प्रसाद रोड, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर. ४) महाराष्ट्र मोटार ट्रेनिंग स्कूल, पेठ वडगांव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.
सातारा जिल्हा - श्री कुंभार मोटार ड्रायव्हिंग स्कूल, फलटण, जि. सातारा.