इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

कोल्हापुरात ३ डिसेंबरपासून जिल्हा साहित्य संमेलन-ग्रंथोत्सव

कोल्हापूर दि. २९ : कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे दि. ३ ते ५ डिसेंबर २०११ पर्यंत कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन आणि ग्रंथोत्सव २०११ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
      राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत ग्रंथ लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव २०११ हा उपक्रम सुरु केला आहे. कोल्हापुरात तीन दिवस आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव व जिल्हा साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ९ ते रात्रौ ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. जिल्ह्यातील खाजगी ग्रंथ विकेत्यांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून रसिक वाचकांना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ उपलब्ध होणार आहेत.
      ग्रंथ महोत्सवाबरोबरच कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात प्रकट मुलाखती, विविध विषयांवर चर्चासत्र, कवि संमेलन तसेच कलारजनी आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
      पत्रकार परिषदेस ज्येष्ठ साहित्यिक चंद्गकुमार नलगे, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, डॉ. सुनिलकुमार लवटे, प्रा. अशोक चौसाळकर, प्रा. भैरव कुंभार, निलांबरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
      दि. ३ ते ५ डिसेंबर २०११ पर्यंत ग्रंथोत्सव व कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन २०११ ची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. ३ डिसेंबर २०११
सकाळी ९-३० ते १० वाजेपर्यंत नोंदणी व चहापान.
उद्‌घाटन सत्र - सकाळी १० ते ११-३०. केशवराव कोठावळे ग्रंथनगरीचे उद्‌घाटन हस्ते सखा कलाल, स्वागतपर भाषण- लक्ष्मीकांत देशमुख, उद्‌घाटनपर भाषण - वसंत आबाजी डहाके, अध्यक्षीय भाषण - सखा कलाल, प्रमुख उपस्थिती - चंद्गकुमार नलगे, डॉ. जयसिंगराव पवार, अशोक चौसाळकर, वसंत शिर्के, मा. गो. माळी, विश्वनाथ शिंदे.
सत्र दुसरे -
सकाळी ११-३० ते दुपारी १-३० - सखा कलाल : व्यक्ती व वाड.मय, वक्ते- प्रा. भैरव कुंभार, रणधीर शिंदे. दुपारी १-३० ते २-३० विश्रांती.
सत्र तिसरे -
      दुपारी २-३० ते ४-३० प्रकट मुलाखत. दुपारी २-३० ते ३-३० गोविंद पानसरे. मुलाखतकार डॉ. रणधीर शिंदे व अ‍ॅड. मिलींद कदम, दुपारी ३-३० ते ४-३० अभिराम भडकमकर मुलाखतकार अरुण नाईक व सुरेश गुदले.
सत्र चौथे -
      दुपारी ४-३० ते ६ माझे लेखन, माझे चिंतन, सत्राध्यक्ष- जालंधर पाटील, सहभाग - मोहन पाटील, मंदा कदम, मंजुश्री गोखले, किरण गुरव.
सत्र पाचवे -
      रात्रौ ८ वाजता कलारजनी सादरकर्ते - सागर अध्यापक, सागर बगाडे.
रविवार दि. ४ डिसेंबर २०११.
सत्र सहावे -
      सकाळी ९-३० ते ११ पर्यंत साहित्य माझा श्वास, सत्राध्यक्ष डॉ. रमेश जाधव, सहभाग- उदयसिंह गायकवाड, विक्रमसिंह घाटगे, अरुण नरके.
सत्र सातवे -
      सकाळी ११ ते दुपारी १२-३० अनुवादित साहित्य : नवे पर्व, सत्राध्यक्ष - डॉ. सहदेव चौगुले, सहभाग - लीना सोहनी, सुप्रिया वकील, चंद्गशेखर मुरगूडकर.
सत्र आठवे -
      दुपारी १२-३० ते २ सीमावर्ती मराठी साहित्य, सत्राध्यक्ष - डॉ. अच्युत माने, सहभाग- महादेव मोरे, भीमराव गस्ती, प्राचार्य माधुरी शानबाग. दुपारी २ ते ३ विश्रांती.
सत्र नववे -
      दुपारी ३ ते ४-३० कवि संमेलन, अध्यक्ष डॉ. धम्मपाल रत्नाकर, सूत्रधार - अशोक भोईटे, सहभाग - राजाभाऊ शिरगुप्पे, मीरा सहस्त्रबुध्दे, रफीक सूरज, नीलांबरी कुलकर्णी, चंद्गकांत पोतदार, विनोद कांबळे, दिनकर खाडे व हेमंत डांगे.
समारोप सत्र -
दुपारी ४-३० ते ६, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर, अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख, प्रमुख उपस्थिती - सखा कलाल, डॉ. सुनिलकुमार लवटे, राजन गवस, संजय शिंदे व सुभाष बोरकर.
सोमवार दि. ५ डिसेंबर २०११
      सकाळी ९ ते रात्रौ ८ वाजेपर्यंत ग्रंथ प्रदर्शन.
तसेच दि. ३ ते ५ डिसेंबर २०११ अखेर दररोज सकाळी ९-३० ते रात्रौ ८ वाजेपर्यंत ग्रंथ प्रदर्शन

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

         कोल्हापूर दि. २८ : राज्याचे कामगार व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ दि. २९ नोव्हेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. २९ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी ७-३० ते ११-३० पर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
      दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७-३० ते ११-३० पर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
      दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ७-३० ते ११-३० पर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
      दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ७-३० ते ११-३० पर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
      दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ७-३० ते ११-३० पर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
      दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ७-३० ते ११-३० पर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
      दि. ५ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ७-३० ते ११-३० पर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.

दादासो जालींदर कांबळे यांच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी सुरु

         कोल्हापूर दि. २८ :  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. १, दुसरा मजला, सेंट्रल बिल्डींग, कोल्हापूर येथे दि. २३ ऑगस्ट २०११ रोजी श्री. दादासो जालींदर कांबळे यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेले असता कायदेशीर रखवालीतून बेडीस हिसका मारुन दुसर्‍या मजल्यावरुन जमिनीवर उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व त्याच दिवशी सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार चालू असताना मयत झाले आहेत. श्री. कांबळे यांचे मृत्यूबाबत दंडाधिकारी चौकशी करण्यासाठी भाऊसाहेब गलंडे, उपविभागीय  दंडाधिकारी, करवीर विभाग, कोल्हापूर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
      या मयताबाबत कोणाला काही पुरावा, तक्रार वगैरे नोंदविण्याची, देण्याची असल्यास त्यांनी ७ डिसेंबर २०११ रोजी अथवा त्यापूर्वी उपविभागीय दंडाधिकारी, करवीर विभाग, भवानी मंडप, कोल्हापूर यांच्याकडे समक्ष आणून द्याव्यात. या तारखेनंतर येणार्‍या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत असे उपविभागीय दंडाधिकारी, करवीर विभाग, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जाती दावा पडताळणीच्या कालमर्यादेबाबत शुध्दीपत्रक

       कोल्हापूर दि. २८ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राखीव प्रभागातून निवडणूक लढवू इच्छिणार्‍या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी त्यांचा जाती दावा पडताळणीसाठीचा विहित नमुन्यातील अर्जासह आवश्यक ते सर्व पुरावे व कागदपत्रे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापुर्वी शक्यतो चार महिने आधी तथापि किमान २ महिने पुर्वी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करावे, अशा आशयाचे शुध्दीपत्रक जारी करण्यात आल्याचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी कळवले आहे.
      याबाबत राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी त्यांच्या जाती दावा पडताळणीसाठी विहित नमुन्यातील अर्जासह आवश्यक ते पुरावे व कागदपत्रे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापुर्वी ६ महिने आधी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावीत याऐवजी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी त्यांचा जाती दावा पडताळणीसाठी विहित नमुन्यातील नमुना अर्जासह आवश्यक ते पुरावे व कागदपत्रे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापुर्वी शक्यतो ४ महिने आधी तथापि किमान २ महिने पुर्वी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करावेत, असे वाचावे.

विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर अंतर्गत रिक्त पद भरती लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर

             कोल्हापूर दि. २८ : विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर अंतर्गत रिक्त पद भरतीसाठी उमेवारांकडून अर्ज तसेच सेवा योजन कार्यालय व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव यांच्याकडून पात्र उमेदवाराची यादी मागविण्यात आली होती. पात्र उमेदवारांना परीक्षेसाठी बोलाविण्यात आले असून  ही परीक्षा  वि. स. खांडेकर प्रशाला, ५२८/ब ई वॉर्ड, व्यापार पेठ, कोल्हापूर येथे होणार आहे.
            परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : वाहनचालक पदाची लेखी परीक्षा रविवार दिनांक ४ डिसेंबर २०११ रोजी दुपारी २-३० ते ३-३०, छायाचित्रकार व साऊंड रेकॉर्डिस्ट पदाची लेखी परीक्षा शनिवार दिनांक १० डिसेंबर २०११ रोजी दुपारी २-३० ते ४-३०, सर्वसाधारण सहायक पदाची लेखी परीक्षा रविवार दिनांक ११ डिसेंबर २०११ रोजी दुपारी २ ते ४ आणि  शिपाई व संदेशवाहक पदाची लेखी परीक्षा याच दिवशी दुपारी २ ते ३ या वेळेत होणार आहे. पात्र उमेदवारांनी परीक्षा केंद्गावर वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे.
       पात्र उमेदवारांना परीक्षा प्रवेश पत्रे पाठविण्यात आली आहेत. पात्र उमेदवारांची यादी विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथील नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. ज्या पात्र उमेदवारांना प्रवेश पत्रे मिळाली नाहीत अशा पात्र उमेदवारांनी परीक्षेपूर्वी या कार्यालयाशी संपर्क साधावा.


मुंबईतील डाक पेंशन अदालतसाठी तक्रारी पाठवा

              कोल्हापूर  दि. २८ : पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करुन प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करते व ग्राहकांचे जास्तीत जास्त संतोषाधिक्य अथवा समाधान वाढविते. ही सेवा देताना संभाषणामध्ये, पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटींमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्टाच्या खात्याने पेन्शन अदालत घेण्याचे ठरविले आहे. अदालतीमध्ये पोस्टाचे अधिकारी तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करतात. प्रधान मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई कार्यालयामध्ये ९ जानेवारी २०१२ रोजी दुपारी ३ वाजता ३२ वी डाक पेंशन अदालत आयोजित केली आहे.    
             डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या निवृत्ती वेतन (पेंशन) संबंधी ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या पेंशन अदालतमध्ये दखल घेतली जाईल. कायदा संबंधित उदा. उत्तराधिकार तथा धोरणात्मक स्वरुप संबंधित तक्रारी पेंशन अदालतमध्ये विचारात घेतली जाणार नाही. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा तारीख व ज्या अधिकार्‍यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव व हुद्दा इत्यादी. संबंधितांनी पेंशनबाबतची तक्रार आर. एन. निकम, लेखा अधिकारी / सचिव, पेंशन अदालत प्रधान मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी. पी. ओ. इमारत, २ रा माळा, मुंबई-४०० ००१ यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह दि. १३ डिसेंबर २०११ पर्यंत अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे प्रधान मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांनी स्पष्ट केले आहे.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर दि. २८ : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ २०११ आणि विजय दिवस असा संयुक्त कार्यक्रम बुधवार दि. ७ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, स्टेशन हेडक्वार्टर्सचे स्टेशन कमांडर कर्नल विजय मणराल, एन. सी. सी. ग्रुप कमांडर कर्नल एच. एस. ग्रेवाल, कोल्हापूरचे सैन्य भरती अधिकारी कर्नल मुरली गोविंदा कुरुप यावेळी उपस्थित राहणार आहेत.
              कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता व शौर्यपदक विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. गतवर्षी ध्वजदिन निधीनिमित्त उत्कृष्ट निधी जमविणारे अधिकारी व व्यक्तींचाही पारितोषिक प्रदान करुन सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व युध्द विधवा, वीर माता-पिता, माजी सैनिक, इतर माजी सैनिक व अवलंबितांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कर्नल सुहास द. नाईक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

हुंडाबळी रोखण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकांकडून प्रयत्न आवश्यक पोलीस अधीक्षक जाधव यांचे प्रतिपादन

         कोल्हापूर दि. २८ : हुंडाबळी रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपल्यापरीने योगदान देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी केले.
         जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातर्फे हुंडाबंदी दिन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी श्री.  जाधव बोलत होते.  येथील श्री. शाहू छत्रपती महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला.
         श्री. जाधव म्हणाले, हुंडा घेणे-देणे ही अनिष्ठ प्रथा आहे. या प्रथेचं उच्चाटन करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेच. पण यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान देण्याची आवश्यकता आहे, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
           अध्यक्षस्थानी श्री. शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्गकांत बोंद्गे होते. त्यांनी प्रगती आणि विकास साधायचा असेल तर महिलांना समान संधी देण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. यावळी प्रा. डॉ. सविता रासम यांचे महिला विषयक कायदे आणि गिरीष लाड यांचे स्त्रीभ्रृण हत्त्या, लिंगभेद या विषयावर भाषणे झाली.
         यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय माने, शिवाजी विद्यापीठातील लोक विकास केंद्गाच्या संचालक डॉ. मंजुषा देशपांडे, उपप्राचार्य एन. व्ही. शहा, मॅग्नम ओपस्‌चे राहुल इंग्रोळे आदी उपस्थित होते.

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

केंद्गीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

         कोल्हापूर दि. २४ : केंद्गीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया उद्या २५ नोव्हेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११-२० वाजता पुण्याहून विशेष विमानाने कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. ११-२५ वाजता मोटारीने ज्योतिबा देवस्थानकडे प्रयाण. ११-५० वाजता ज्योतिबा देवस्थान येथे आगमन व दर्शन. दुपारी १२-२० वाजता कोल्हापुरकडे प्रयाण. १२-३५ महालक्ष्मी मंदिर येथे आगमन व दर्शन. १२-५० वाजता छत्रपती शाहू महाराज पॅलेसकडे प्रयाण. १ वाजता शाहू महाराज पॅलेस येथे राखीव. १-४५ वाजता शाहू महाराज पॅलेसहून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. २-०५ वाजता विशेष विमानाने पुण्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

२६ नोव्हेंबरला महाविद्यालयीन विद्यार्थी कार्यशाळा व हुंडाबंदी दिन कार्यक्रमाचे आयोजन

       कोल्हापूर दि. २४ : जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, कोल्हापूर व श्री शाहू शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर २०११ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी कार्यशाळा व हुंडाबंदी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृह, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूर येथे २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९-३० वाजता होणार आहे.
      कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार असून श्री शाहू शिक्षण संस्थेचे सचिव चंद्गकांत ऊर्फ सुभाष बोंद्गे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या लोक विकास केंद्गाच्या संचालक डॉ. मंजुषा देशपांडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
      यावेळी महिला विषयक कायदे या विषयावर प्रा. डॉ. सविता रासम तर स्त्रीभ्रृण हत्त्या, लिंगभेद या विषयावर गिरीष लाड मार्गदर्शन करणार आहेत.
     कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापुरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय माने व श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. डी. आर. मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

काम वाटप समितीची बैठक ३० नोव्हेंबरला

          कोल्हापूर दि. २४ : कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त जिल्हा परिषदेकडे सर्व नोंदणीकृत मजूर सह. संस्था यांच्यासाठी काम वाटप समितीची बैठक जिल्हा परिषद जुने सभागृह (कागलकर हाऊस), जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. ३० नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी ११ वाजता तर सुशिक्षीत बेरोजगार (स्थापत्य) अभियंते यांची बैठक दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
      तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार (स्थापत्य) अभियंते,  मजूर  सह. संस्था  यांनी  आपले काम  मागणीचे अर्ज दि. २९ नोव्हेंबर २०११ रोजी सायं. ५-४५ वाजेपर्यंत  बांधकाम  विभाग,  जिल्हा परिषद  कोल्हापूर  यांच्या  कार्यालयात  द्यावेत.  तसेच ई-टेडरिंग प्रक्रिया दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरु होणार असल्याने याबाबतचे प्रशिक्षण सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर संस्थांना सभेच्या दिवशी दुपारी ३ वाजता आयोजित केले आहे, असे सदस्य सचिव, कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

निवृत्ती व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी १० डिसेंबरपर्यंत हयातीचे दाखल द्यावेत

         कोल्हापूर दि. २३ : राज्य शासनाच्या निवृत्ती व कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी हयात असल्याचे दाखले आपण घेत असलेल्या बँकेकडे १० डिसेंबर २०११ पर्यंत द्यावेत. तसेच १५ डिसेंबर २०११ नंतर बँकेकडून आलेल्या हयातीच्या दाखल्यांचा माहे डिसेंबर २०११ च्या मासिक निवृत्ती वेतनामध्ये विचार केला जाणार नाही, असे कोषागार अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सैन्य दलात भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी कोल्हापुरात २८ नोव्हेंबरला निवड चाचणी

           कोल्हापूर दि. २३ : सैन्य दलात भरती होऊ इच्छिणार्‍या युवकांना आवश्यक असलेले प्रशिक्षण घेता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेले माजी सैनिक महामंडळाद्वारे (मेस्को) करंजे नाका, सातारा येथे सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्ग चालविले जाते. या केंद्गात निवास व भोजनासह दिल्या जाणार्‍या ३० दिवसाच्या प्रशिक्षणासाठी शासन निर्धारित चार हजार रुपये शुल्क आहे. या केंद्गातील ७८ वे प्रशिक्षण शिबीर २ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०११ या कालावधीत घेतले जाणार आहे. प्रवेशासाठी निवड चाचणीचा कार्यक्रम २८ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून महासैनिक ट्रेनिंग सेंटर, ७४९, ई वॉर्ड, लाईन बझार, कसबा बावडा, कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केला आहे.
        प्रशिक्षणासाठी इच्छुक युवकांनी निवड चाचणीच्या ठिकाणी सकाळी ९ वाजता मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रकांसह उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा. चाचणीनंतर पात्र ठरलेल्या युवकांना प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. निर्धारित शुल्कापैकी दोनशे रुपये लगेच भरुन त्यांनी शिबीरातील प्रवेश निश्चित करावा. गोवा राज्य व कर्नाटक सीमा भागातील युवकांनाही प्रशिक्षणाचा लाभ दिला जाईल. अधिक माहितीसाठी कमाडंट, महासैनिक ट्रेनिंग सेंटर, कोल्हापूर यांच्याशी सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत दूरध्वनी ०२३१-२६६३१३२ किंवा मोबाईल ७५८८६२४०४३, ९९२३४४०७६५३ वर संपर्क साधावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.