इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ३१ डिसेंबर, २०११

नाशिक येथील देवळाली कॅम्पमध्ये विविध पदांसाठी भरती

       कोल्हापूर दि. ३१ : नाशिक येथील ११६ इन्फंट्री बटालियन (टीए) पॅरा, धोंडी रोड, देवळाली कॅम्प देवळाली या ठिकाणी प्रादेशिक सेनेत सोल्जर जीडी, चिफ (जीडी), क्लार्क, चिफ कम्युनिटी, चिफ मेस, हाऊस किपर, टेलर आणि इक्वीपमेंट रिपेअर या पदासाठी ६ जानेवारी ते ९ जानेवारी २०१२ या कालावधीत भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
      सोल्जर (जीडी) साठी शैक्षणिक पात्रता दहावी ४५ टक्के गुणांनी उत्तीर्ण आहे. चिफ कम्युनिटी, चिफ मेस, टेलर, इक्वीपमेंट रिपेअर या पदासाठी दहावी उत्तीर्ण, टेलरसाठी आयटीआय शिवण आणि कर्तन, इक्वीपमेंट रिपेअरसाठी आयटीआय मॅन्युफॅक्चरर ऑफ फुटवेअर, अशी पात्रता आहे. हाऊस कितपरसाठी ८ वी उत्तीर्ण, क्लार्क स्टाफ ड्युटीजसाठी इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेची इयत्ता बारावी ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण, प्रत्येक विषयात ४० टक्के गुण आवश्यक, संगणक आणि टंकलेखनाचे ज्ञान असणार्‍या उमेदवारांनी लेखी परीक्षेतील गुणांच्या २० टक्के बोनस गुण दिले जातील.
      भरतीसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत. शैक्षणिक प्रमाणपत्रांची मूळ आणि छायांकित प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, चारित्र्य प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रेशन कार्ड / निवडणूक ओळखपत्र, एनसीसी/खेळाचे प्रमाणपत्र, अविवाहीत (वय १८ ते २१ वर्ष) दाखला.
      तरी पात्र इच्छुक युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी केले आहे.

साप्ताहिक फौजी विशेष अंकासाठी अर्ज करावा

        कोल्हापूर दि. ३१ : साप्ताहिक फौजी विशेष या अंकामध्ये सैनिक कल्याण विभागाची माहिती प्रकाशित होणार आहे. या साप्ताहिकाची वार्षिक वर्गणी दोनशे रुपये आहे. तरी माजी सैनिक संघटना, माजी सैनिक, युध्द विधवा, आजी माजी सैनिकांच्या अवलंबितांनी या विशेषांकाचे सभासद होण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे अर्ज करावा, म्हणजे सभासद होण्यासाठी अर्ज मागविण्यात येतील. तरी या संधीचा इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी केले आहे.

राष्ट्रीय मतदार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करणारराष्ट्रीय मतदार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करणार

       कोल्हापूर दि. ३१ : राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी २०१२ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख होते.
      दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार राष्ट्रीय मतदार दिनी काय कार्यक्रम आखता येतील याचे नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
      राष्ट्रीय मतदार दिनी म्हणजेच २५ जानेवारी २०१२ रोजी महाविद्यालयात निबंध स्पर्धा घ्याव्यात, सायकल रॅली काढणे, पथनाट्य, लोककला, लोकनृत्य आदी कार्यक्रमातून मतदानाबाबत जागृती करावी, असे ठरले.
      बैठकीस उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव सी. जी. शिंदे, कलाशिक्षक आझाद नायकवडी, अनंत यादव, भारती वैशंपायन आदी उपस्थित होते.

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

क्रीडा मार्गदर्शक पदासाठी व्यावसायिक चाचणी कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर दि. ३० : क्रीडा मार्गदर्शक पदासाठी गुणवत्तानिहाय पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या व्यावसायिक चाचणीचा कार्यक्रम १६ ते २४ जानेवारी २०१२ या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आल्याचे उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर यांनी कळविले आहे.
क्रीडा मार्गदर्शक पदासाठी दिनांक २३ मे २०१० रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या लेखी परीक्षेतील गुणवत्तानिहाय पात्र उमेदवारांची यादी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या http://www.mahasportal.gov.in/ या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गुणवत्तानिहाय पात्र उमेदवारांच्या ८० गुणांच्या व्यावसायिक चाचणीचा कार्यक्रम शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे होणार असून पात्र उमेदवारांना आवेदनपत्रे पाठविण्यात आली आहेत. वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र यादीतील ४५ गुण प्राप्त उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना व्यावसायिक चाचणीसाठी आवेदनपत्र प्राप्त झाले नसल्यास अशा उमेदवारांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील दूरध्वनी क्र. २६१४००७१ अथवा भ्रमणध्वनी   क्र. ८९७५०६२६३६ व ८४४६२५३१०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

दोनशे पंचवीस कोटी रुपयांचा आराखडा मंजुरीसाठी सादर करणार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय

       कोल्हापूर दि. ३० :  कोल्हापूर जिल्ह्याची सन २०१२-१३ साठीची २२५ कोटी रुपयांची सर्वसाधारण वार्षिक योजना अंतिम मंजुरीसाठी सादर करण्याचा निर्णय आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सहकार, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील होते.  जिल्हाधिकारी  कार्यालयातील  महाराणी  ताराबाई सभागृहात बैठक झाली.
      राज्य शासनाने २०१२-१३ साठी १५८.११ कोटी रुपयांची कमाल मर्यादा जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यास घातली होती. पण आमदार सा. रे. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील लहान गटाच्या समितीने ६६.८९ कोटी रुपयांच्या जादा मागणीसह २२५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. सर्वसाधारण समितीनेही या आराखड्यास मंजुरी दिली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
      पालकमंत्री म्हणाले की, रस्ते व साकवसाठी ४० कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. ग्रामीण भागासाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत १० कोटी रुपयांची जास्त तरतूद या आराखड्यात प्रस्तावित केली आहे. पशुसंवर्धन विभागासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १७.५५ कोटी रुपयांची अधिकची तरतूद प्रस्तावित करण्यात आली असून एकूण ८०.४७ कोटी रुपयांचा आराखडा केला आहे. यास आज मान्यता देण्यात आली.
      कोल्हापूर गोल्ड मिशन, सेव्ह द बेबी गर्ल, तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्ग, दीपशिखा, वनपर्यटन, हेल्थ कार्ड योजना, प्रीआयएएस ट्रेनिंग सेंटर आधुनिकीकरण या सर्व नाविन्यपूर्ण योजनाही २०१२-१३ मध्ये सुरु ठेवण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
      बैठकीस कामगार मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्षा यशोदा कोळी, खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार राजू शेट्टी, आमदार के. पी. पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार चंद्गदीप नरके आदी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, महानगरपालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एप्रिलअखेरपर्यंत ऊसाचे गाळप पूर्ण होईल
      राज्यात आतापर्यंत ३०० लाख मेट्रीक टन गाळप पूर्ण झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, एप्रिलच्या अखेरीपर्यंत राज्यातील ऊसाचे गाळप पूर्ण होईल. मात्र यंदा ५० ते ६० लाख टन कमी गाळप होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यात ९२ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होण्याची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात ९० लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होईल. केंद्ग सरकारने १० लाख मेट्रीक टन साखर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. पण ही मुदत १ जानेवारीपर्यंतच आहे. ही मुदत वाढवून मिळावी यासाठी केंद्ग सरकारकडे विनंती करण्यात आली आहे.
      राज्यातील साखर कारखान्यातून सहवीज निर्मितीतून सध्या ६०० मेगावॅट वीज निर्मिती होते. डिसेंबर २०१२ अखेर ही वीज निर्मिती १२०० मेगावॅट जाण्याची अपेक्षा आहे. यासाठी राज्यात आतापर्यंत ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.
      ऊस तोडणीसाठी राज्यात हार्वेस्टरसाठी अनुदान देण्याची योजना आहे. त्यासाठी ९० प्रस्ताव आतापर्यंत आले आहेत. हार्वेस्टर घेण्यासाठी २५ टक्के किंवा २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची योजना आहे, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली.
      कोल्हापुरात आयआरबी कंपनीकडून आकारल्या जाणार्‍या प्रस्तावित टोल संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत संबंधित खात्याचे मंत्री, जिल्ह्यातील मंत्री व टोल विरोधी शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल असे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शिष्टमंडळास सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर टोल विरोध करणार्‍या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडली.

शिशुगृहाच्या विकासासाठी ५१ लाख रुपये पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांची घोषणा

       कोल्हापूर दि. ३० : कोल्हापुरातील जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेच्या बाल कल्याण संकुलातील शिशुगृहाच्या विकासासाठी ५१ लाख रुपये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याची घोषणा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे केली.
      बाल संकुलातील शिशुगृहाच्या इमारतीचे उद्‌घाटन व बालकांच्या स्थलांतराचा कार्यक्रम पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार सदाशिवराव मंडलिक होते.
      पालकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, या शिशुगृहातील मुलांचे भवितव्य घडविण्याची आपली जबाबदारी आहे. या संकुलातील मुले शालेय शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
      बाल संकुलातील कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. पुढील शंभर वर्षात बाल संकुलातील मुलांना अडचण भासणार अशी इमारत उभी करण्यासाठी सर्वांच्या सहभाग असणे गरजेचे आहे. कोल्हापूरचे नागरिक दानशूर असल्याने त्यांच्या मदतीतून हे स्वप्न साकार होईल, असेही ते म्हणाले.
      खासदार सदाशिवराव मंडलिक म्हणाले, बाल संकुलाने निराधारांना आधार देण्याची काम केले आहे. या संस्थेला खासदार निधीतून अधिकाधिक मदत देण्याचा माझा प्रयत्न राहील.
      यावेळी हिमाचल प्रदेश विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
      जिल्हा नियोजन समितीकडून बाल संकुलास भरीव मदत मिळण्याची मागणी करुन हिमाचल विद्यापीठाकडून मला मिळालेला सन्मान हा केवळ माझा सन्मान नसून तो कोल्हापुरवासियांचा आहे, असे सांगून श्री. प्रतापसिंह जाधव म्हणाले जनतेने दिलेल्या मदतीतून बाल संकुलाचा विकास होत आहे ही बाब आनंदाची आहे.
      आजच्या कार्यक्रमात व्हिजन प्रकाशनतर्फे १ लाख रुपयांचा धनादेश, तालीम संघाकडून ६२ हजार रुपये बाल संकुलास देण्यात आले. तसेच  इतर नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांनीही मदत दिली.
      यावेळी जिल्हाधिकारी तथा संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपुरकर, शिवाजीराव कदम, भिकशेठ पाटील, पद्मा तिवले तसेच नागरिक उपस्थित होते.

त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. ३० : त्रिपुराचे राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दि. २ जानेवारी २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      सोमवार दि. २ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ७-२० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर येथे आगमन शिवराज पोपटराव जगदाळे, भाऊसाहेब जगदाळे मार्ग, कोल्हापूर यांच्याकडील कार्यक्रमास उपस्थिती.
      मंगळवार दि. ३ जानेवारी २०१२ रोजी मालोश्री मेडिकल सर्व्हिस सोसायटी, कोल्हापूर यांच्या कार्यक्रमास उपस्थिती व डॉ. रणकांबळे, डायरेक्टर डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, सांगली यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभास उपस्थिती.
      बुधवार दि. ४ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम सोसायटी येथे एकनाथ पाटील यांच्या कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ४-३० वाजता कोल्हापूर जिल्हा होमगार्ड संघटना यांच्या कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ८-३० वा. महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम राहील.

गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

तिसर्याा एशियन फिल्म फेस्टीव्हलची सांगता बाबू बँड बाजा सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा मानकरी

         कोल्हापूर दि. २९ : तिसर्‍या एशियन फिल्म फेस्टीव्हलमध्ये बाबू बँड बाजा हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. बी. नांद्गेकर यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा उत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार मंगेश देसाई तर अरुण सरनाईक यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा उत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार मिलींद शिंदे यांना मिळाला. स्मिता पाटील यांच्या स्मृतीनिमित्त उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिताली जगताप हिने पटकाविला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार बाबू बँड बाजा या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांना मिळाला.
      तिसर्‍या एशियन फिल्म फेस्टीव्हलची आज सांगता झाली. शाहू स्मारक भवनात आजचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, रशियन विदुषी डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.
      डॉ. मोहन आगाशे म्हणाले, चित्रपट आणि साहित्याने कुतुहल निर्माण करण्याची आवश्यकता आहे. चित्रपटांनी एखाद्या विषयावर कुतुहल निर्माण केल्यास त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा दर्शकाला होते, हेच खरे त्या चित्रपटाचे यश आहे. चित्रपटांची भाषा ही दृकश्राव्य असते. ही भाषा आपल्याला उपजतच असते. पण या भाषेचेही शिक्षण मिळणे आवश्यक आहे.
      जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी एशियन फिल्म फेस्टीव्हलला चांगला प्रतिसाद मिळत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले. या फेस्टीव्हलने कोल्हापुरातील तरुणांना व्यासपीठ करुन दिले आहे असे सांगितले. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलींद अष्टेकर, महाराष्ट्र संस्कृतीच्या अभ्यासिका डॉ. इरिना ग्लुश्लोव्हा, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, चंद्गकांत जोशी, दिलीप बापट आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
      दिग्दर्शक चंद्गकांत जोशी यांनी प्रास्ताविक तर सोनाली नवांगुळ यांनी सूत्रसंचलन केले.   पर्यटन या विषयावर आधारित लघु चित्रपटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील विजेते पुढीलप्रमाणे - चित्रपटाचे नांव, कंसात दिग्दर्शक १) करवीर काशी (शिरीष हुपरीकर), २) इन्स्पिरेशन ऑफ कोल्हापूर (प्रसाद मयेकर), ३) चवदार कोल्हापूर (सौरभ प्रभूदेसाई), उत्तेजनार्थ - १) कोल्हापूरची एकपाषाणी मंदिरे (अमित गद्गे), २) जुना राजवाडा इतिहासाचा साक्षीदार (मास कम्युनिकेशन विभाग, शिवाजी विद्यापीठ), विशेष उल्लेखनीय - १) पाणी, किंमत (यशोधन गडकरी), २) दगड फूल (सुभाष पाटील).

पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. २९ : राज्याचे सहकार व संसदीय कार्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०११ रोजी दुपारी ३ वाजता सोनारी येथून खाजगी हेलिकॉप्टरने कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल हेलिपॅडवर आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. ३-०५ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व शासकीय अधिकार्‍यांसमवेत चर्चा. ३-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे पुरवठा विभागाच्या दक्षता समितीच्या बैठकीस उपस्थिती. ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. सायं. ६ वाजता बालसंकुल, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे बालसंकुल शिशुगृहाचे उद्‌घाटन कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ ८ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथून मोटारीने पुण्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा सुधारित कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

      कोल्हापूर दि. २९ : कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ ३० डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सुधारित सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. ३० डिसेंबर २०११ रोजी सकाळी ७ वा. महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व कागलकडे प्रयाण. ७-३० ते १०-३० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. १०-३० वा. धैर्यशील जाधव कसबा सांगाव यांच्याकडे वास्तुशांती समारंभास उपस्थिती. ११ ते १२ वाजेपर्यंत माद्याळकडे प्रयाण, आगमन व शहीद जवान यांच्या घरी भेट. दुपारी २ वाजता सावर्डे बुद्गुक हायस्कूल येथील विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ४ वाजता. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. सोयीनुसार कागलकडे प्रयाण व मुक्काम.
      दि. ३१ डिसेंबर रोजी  सकाळी ७-३० ते ११ वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११ वाजता शासकीय विश्रामगृह, कागल येथे व्यवस्थापक (एचआर) सोक्टास कंपनी यांच्या समवेत चर्चा. ११-३० वा. शासकीय विश्रामगृह, कागल येथे विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, कोल्हापूर यांच्या समवेत चर्चा. दुपारी १२ वाजता कोल्हापूरकडे प्रयाण. १२-३० वा. शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे १ ते १-३० पर्यंत जिल्हा निबंधक श्री. बल्लाळ, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या समवेत चर्चा. १-३० वा. हसुर बु. येथील कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. १-४५ वा. पिंपळगांव खु. ता. कागल येथील कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. २ वाजता अनिल आवळे, क. सांगाव यांच्या समवेत चर्चा. २-१५ वा. इचलकरंजीचे जितेंद्ग लोकरे यांच्या समवेत चर्चा. २-३० वाजता चिखली येथील श्री. सय्यद यांच्या समवेत चर्चा. ४-३० वाजता कागलकडे प्रयाण. ५ वाजता आंबेडकर भवन, कागल येथे आगमन व वादळ ग्रुप, कागल यांच्या पाचव्या वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थिती. ६ वाजता खाजगी कामानिमित्त राखीव व सोयीनुसार कागल निवासस्थानी मुक्काम.

पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

          कोल्हापूर दि. २९ : राज्याचे सहकार व संसदीय कार्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
         शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०११ रोजी दुपारी ३ वाजता सोनारी येथून खाजगी हेलिकॉप्टरने कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल हेलिपॅडवर आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. ३-०५ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व शासकीय अधिकार्‍यांसमवेत चर्चा. ३-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे पुरवठा विभागाच्या दक्षता समितीच्या बैठकीस उपस्थिती. ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. सायं. ६ वाजता बालसंकुल, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे बालसंकुल शिशुगृहाचे उद्‌घाटन कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ ८ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथून मोटारीने पुण्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

        कोल्हापूर दि. २९ : कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ ३० डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. ३० डिसेंबर २०११ रोजी सकाळी ७ वा. महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व कागलकडे प्रयाण. ७-३० ते १०-३० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. १०-३० वा. कोल्हापूरकडे प्रयाण. ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी २ वाजता सावर्डे बुद्गुक हायस्कूल येथील विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार धैर्यशील जाधव कसबा सांगाव यांच्याकडे वास्तुशांती समारंभास उपस्थिती व कागलकडे प्रयाण व मुक्काम.
      दि. ३१ डिसेंबर रोजी  सकाळी ७-३० ते ११ वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११ वाजता शासकीय विश्रामगृह, कागल येथे व्यवस्थापक (एचआर) सोक्टास कंपनी यांच्या समवेत चर्चा. ११-३० वा. शासकीय विश्रामगृह, कागल येथे विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, कोल्हापूर यांच्या समवेत चर्चा. दुपारी १२ वाजता कोल्हापूरकडे प्रयाण. १२-३० वा. शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे १ ते १-३० पर्यंत जिल्हा निबंधक श्री. बल्लाळ, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या समवेत चर्चा. १-३० वा. हसुर बु. येथील कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. १-४५ वा. पिंपळगांव खु. ता. कागल येथील कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. २ वाजता अनिल आवळे, क. सांगाव यांच्या समवेत चर्चा. २-१५ वा. इचलकरंजीचे जितेंद्ग लोकरे यांच्या समवेत चर्चा. २-३० वाजता चिखली येथील श्री. सय्यद यांच्या समवेत चर्चा. ४-३० वाजता कागलकडे प्रयाण. ५ वाजता आंबेडकर भवन, कागल येथे आगमन व वादळ ग्रुप, कागल यांच्या पाचव्या वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थिती. ६ वाजता खाजगी कामानिमित्त राखीव व सोयीनुसार कागल निवासस्थानी मुक्काम.
      दि. १ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ७-३० ते ९-३० कागल निवासस्थानी गाठीभेटी. ९-३० वा. कोल्हापूरकडे प्रयाण. १० वाजता दैनिक पुढारी प्रधान कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन व दैनिक पुढारीच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थिती. ११ ते ४ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे राखीव. ४ वाजता सांगावकडे प्रयाण. ५ वाजता मौजे सांगाव येथे आगमन व विविध विकास कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार कागलकडे प्रयाण व मुक्काम.
      दि.२ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ७-३० ते ११-३० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. ३ वाजता जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित छ. शाहू पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती. सायं. ५ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे बुधले अ‍ॅन्ड बुधले कंपनीचे मालक व कर्मचारी यांच्या समवेत बैठक. ६ वाजता सिध्दनेर्ली येथील विविध विकास कामांचे उद्‌घाटन कार्यक्रमास उपस्थिती. ८ वाजता सिध्दनेर्लीहून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. रात्रौ ८-३० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

बुधवार, २८ डिसेंबर, २०११

स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने वाढविण्याची प्रथा घराघरातून निर्माण होणे गरजेचे -- डॉ. सुनीलकुमार लवटे

        कोल्हापूर दि. २८ : स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने वाढविण्याची प्रथा घराघरातून निर्माण होणे गरजेचे आहे. शैक्षणिक केंद्गे ही माणुसकी निर्माण करणारी केंद्गे असून स्त्री-पुरुष भाव साक्षरता निर्माण करण्यासाठी शिक्षणासाठी पुनर्बांधणी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
      महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई पुरस्कृत विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर आणि  जिल्हा महिला व बालक विकास विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनीकरिता आयोजित केलेल्या प्रबोधन शिबीरात डॉ. लवटे बोलत होते.
      कायदेविषयक शिक्षणाचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करावा असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी व्यक्त केले.
      लेक लाडकी अभियानच्या प्रवर्तक अ‍ॅड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, चुकीचे वागणार्‍यांची ताकद आपल्या निष्क्रीयतेने वाढते. आपण सक्रिय राहिल्यास चुकीचे वागणारे वचकून राहतात. स्त्री-पुरुष दोघांनीही नीतीनियम पाळणे आवश्यक आहे. स्वयंशिस्त बिघडली की कायद्याची गरज भासते. त्यांनी महिलांविषयी असणारे सामाजिक कायदे, स्त्रीभ्रृण हत्या, मुलींचे घटते प्रमाण याविषयी मार्गदर्शन केले.
      समस्या या स्वनिर्मित असून भावनेचा निचरा होणे आवश्यक असते. यासाठी मानसिकता बदलली पाहिजे याची सुरुवात स्वतःपासून व्हावी, असे मार्गदर्शन डॉ. कालिंदी रानभरे यांनी केले.
      जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय माने यांनी प्रबोधन शिबीर आयोजनामागील भूमिका विषद केली. प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करुन स्वागत केले. प्रा. लीलावती पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचलन कु. स्नेहल दुर्गुळे हिने केले.
      शिबीरास प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

इमारत व इतर बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया सुरु

            कोल्हापूर दि. २८ : इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम १९९६ व नियम २००७ नुसार कोल्हापूर जिल्ह्यात इमारत व इतर बांधकामावर काम करणार्‍या कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी १८ ते ६० वयोगटातील बांधकाम कामगारांनी नोंदणीसाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत पासपोर्ट आकाराच्या दोन छायाचित्रासह नोंदणी फी पंचवीस रुपये, मासिक वर्गणी रुपये पाचप्रमाणे एका वर्षाची साठ रुपये, इमारत व इतर बांधकामावर किमान ९० दिवस काम असल्याबाबतचे नियोक्त्याचे प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी येथे संपर्क साधावा असे कोल्हापुरच्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी कळविले आहे.