इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २९ फेब्रुवारी, २०१२

स्वर्ण जयंती ग्रामस्वरोजगार योजनेअंतर्गत पन्हाळा येथे कार्यशाळा

कोल्हापूर दि. २८ : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर व पंचायत समिती पन्हाळा यांच्या वतीने   दि. १ मार्च २०१२ रोजी पन्हाळा येथे स्वर्ण जयंती ग्रामस्वरोजगार योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
           ही कार्यशाळा नगरपरिषद हॉल, मयूर बाग येथे सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी बचत गटांचे अध्यक्ष व सचिव, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षीका, ग्रामसेवक, बँक प्रतिनिधी, बचत गटांशी संबंधित स्वयंसेवी संस्था यांना निमंत्रित केले आहे. या कार्यशाळेत बचत गटाची संकल्पना आणि कार्यपध्दती, उद्योजकता, जाणिव जागृती, व्यक्तिमत्व विकास, बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीचे कौशल्य, पॅकेजींग व मार्केटिंग, बचत गटाबाबत बँकांची भूमिका, विविध शासकीय योजनामध्ये बचत गटांचा सहभाग या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पन्हाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी केले आहे.

कोल्हापुरात चार मार्चला हौसिंग दरबारचे आयोजन

          कोल्हापूर दि. २८ : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर, उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर शहर आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, करवीर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी व प्रश्नासंदर्भात ४ मार्च २०१२ रोजी सकाळी ११ वाजता हिंद को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., रुईकर कॉलनी कोल्हापूर या संस्थेच्या सभागृहात हौसिंग दरबार आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था व सभासदांनी त्यांच्या अडचणीबाबत हौसिंग दरबारचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कोल्हापुरात चार मार्चला महालोकअदालत

            कोल्हापूर दि. २८ : मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे दि.४ मार्च २०१२ रोजी सकाळी १०-३० वाजल्यापासून महालोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सर्व फौजदारी कायद्याखालील केसेस ठेवण्यात आलेल्या आहेत. महालोकअदालतमध्ये एकूण दहा पॅनेल्स ठेवण्यात आलेली आहेत. तरी सर्व संबंधितांनी या महालोकअदालतचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी, कोल्हापूर यांनी केले आहे.

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१२

पशुपालकांनी लाळखुरकत रोगाची घ्यावयाची काळजी व उपाययोजना

      कोल्हापूर दि. १७ : जिल्ह्यातील कांही तालुक्यामध्ये सध्या लाळखुरकत रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असून कोल्हापूरचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी पशुपालकांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजना सुचविल्या आहेत.
      लाळखुरकत हा दुभंगलेल्या खुरांच्या जनावरांमध्ये आढळणारा अति सांसर्गिक विषाणुजन्य आजार आहे. गुरे, शेळ्या, मेंढ्या, डुकरे आदी पाळीव प्राण्यांसोबतच हरीण, सांबर, रानडुकरे, रानरेडे यांच्यामध्येही हा रोग प्रामुख्याने दिसून येतो. रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोग झालेल्या जनावरांच्या तोंडातील लाळ, नाकातील स्त्राव यामुळे बाधीत चारा, पाणी, खाद्य, भांडी व सभोवतालची हवा यामुळे होतो. सार्वजनिक पाणवठे, चराऊ कुरणे, गुरांचे आठवडी बाजार, जत्रा, पशुप्रदर्शने, साखर कारखाने अशा ठिकाणी लाळ आलेल्या जनावरांपासून निरोगी जनावरांमध्ये रोगप्रसार होतो.
      लाळ झालेल्या जनावरांमध्ये १०६ ते १०८ डिग्री फॅ. ताप येणे, तोंडातून लाळ गळणे, नाकातून स्त्राव वाहणे, जिभेवर, खुरांच्या बेचक्यात, कासेवर फोड येऊन ते फुटल्यामुळे जखमा होऊन जनावरांचे खाणे-पिणे बंद होणे व लंगडणे अशी लाळखुरकतमध्ये लक्षणे दिसून येतात. जनावरांचे मर्तुकीचे प्रमाण अल्प असले तरीही लहान वासरात व संकरीत जनावरांत मर्तुक दिसून येते.
आजारी जनावरांची घ्यावयाची काळजी
      आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून ताबडतोब वेगळे करावे. त्यांची पाण्याची तसेच खाद्याची भांडी वेगळी ठेवावी. तोंडातील जखमांवर खाण्याचा सोडा, हळद व गोडेतेल यांचे मिश्रण लावावे. दोन टक्के पोटॅशियम परमँग्नेटच्या सौम्य द्गावणाने पायातील व तोंडातील जखमा धुवाव्यात. जनावरांना खाण्यासाठी ऊसाचे वाडे अथवा कठीण वैरणीऐजजी मऊ गवत व तत्सम हिरवी वैरण द्यावी. गूळ घालून तयार केलेली नाचणी व ताकापासूनची आंबील योग्य प्रमाणात पाजावी. गोठ्यात व परिसरात चुन्याची फक्की मारावी. तसेच ४ टक्के धुण्याच्या सोड्याच्या द्गावणाची फवारणी करावी. प्रतिजैवके, ताप व वेदनाशामक औषधांनी उपचार करावा. आजारी व निरोगी जनावरे एकाच पाणवठ्यावर, चराऊ रानात आणू नयेत. आजारी जनावरांचे दूध उकळून, थंड करुन कोमट स्थितीत वासरांना द्यावे. शक्यतो वासरांना कासेला पाजू नये. गोठ्यातील जनावरांना लाळ आल्यास इतर जनावरांना ताबडतोब लसीकरण करण्याची घाई करु नये. प्रतिबंधात्मक लसीकरण वर्षातून किमान दोनवेळा करुन घ्यावे.
      जनावरांना उपचाराकरिता तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. जिल्हा स्तरावर जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त दूरध्वनी क्रमांक ०२३१/२६२२७८२, २६२६५४३, मोबाईल ९४२३७२५६५९ तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दूरध्वनी क्रमांक ०२३१/२६५२३३१ मोबाईल ९८२२३९८७७३ यांच्याशी संपर्क साधावा.

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

नोंदणीकृत ठेकेदारांसाठी पुणे येथे ई-टेंडरिंग निविदा प्रणाली कार्यशाळा

           कोल्हापूर दि. १६ : सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोंदणीकृत ठेकेदारांसाठी पुणे येथे ई-टेंडरिंग निविदा प्रणाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
          सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये ई-टेंडर प्रणाली विकसित करण्यात येणार असून ई-टेंडरिंगसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांची पायलट प्रोजेक्ट म्हणून नियुक्ती झाली आहे. या प्रणालीबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी दिनांक २३ फेब्रुवारी २०१२ रोजी दुपारी २ वाजता, आय.टी.सी. प्रशिक्षण हॉल, दक्षता व गुणनियंत्रण, मंडळ कार्यालय, हॉटेल सागर  प्लाझा / एस.जी.एस. मॉल जवळ, पुणे-१ येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत ठेकेदारांना Digital Sigature Certificate Request Form भरणे व ई-टेंडरिंग निविदा प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ संबंधित ठेकेदारांनी घ्यावा असे आवाहन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर यांनी केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक इचलकरंजीचा आठवडा बाजार पुढे ढकलण्याचे आदेश

      कोल्हापूर दि. १६ : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१२ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान ७ फेब्रुवारी २०१२ रोजी पार पडले असून मतमोजणी १७ फेब्रुवारी २०१२ रोजी होणार आहे.
      अप्पर जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांच्या सुचनेनुसार व पणन संचालक यांच्या परवानगीनुसार शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी २०१२ रोजी इचलकरंजीत भरणारा आठवडा बाजार पुढे ढकलून तो अन्य दिवशी भरविण्यास हातकणंगले तालुका कार्यकारी दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी आदेश दिले आहे.

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२

एक मार्चपासून शंभर टक्के घरपोच गॅस सेवा पुरविणार - जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे

      कोल्हापूर दि. १५ : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गॅस ग्राहकांना मार्च २०१२ पासून शंभर टक्के घरपोच गॅस सिलेंडर सेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांनी आज दिली.
      श्री. शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, कोणत्याही ग्राहकाने गॅस एजन्सीमध्ये जाऊन सिलेंडर देण्याबाबत आग्रह धरु नये. रेशनकार्ड नसणार्‍या गॅसधारकांस १ मार्च २०१२ पासून सिलेंडर वितरित करता येणार नाही. एकाच कुटुंबातील सदस्य विभक्त राहत असल्यास त्याचा खात्रीलायक पुरावा सादर केल्यास सदर अर्जदारास फक्त गॅससाठी शुभ्र शिधापत्रिका देण्यात येणार आहे.
      कंपनीकडून पूर्वी ५ किलो वजनाची लहान सिलेंडर वितरित केलेली आहेत. ही सिलेंडर्स ग्राहकांनी ज्या त्या एजन्सीकडे परत करावयाची आहेत. ज्यामुळे वाहनांमध्ये अनाधिकृत गॅस किट तयार करण्यावर निर्बंध येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वाहनांची अचानक तपासणीचे जिल्हाधिकारी देशमुख यांचे आदेश घरगुती गॅस सिलेंडरचा वापर टाळण्यासाठी भरारी पथके

      कोल्हापूर दि. १५ : घरगुती गॅस सिलेंडरचा वाहनांमध्ये अनाधिकृतपणे वापर करणार्‍या सर्व वाहनांची अचानक तपासणी करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज दिले.
      जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व गॅस वितरक, गॅस कंपनीचे अधिकारी, ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक व पोलीस अधीक्षक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांचे निरीक्षक यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
      तपासणीकामी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये पाच पथकांची नियुक्ती करण्यात येणार असून पथक प्रमुख म्हणून तहसिलदार, नायब तहसिलदार यांची नियुक्ती करुन पथक सदस्य म्हणून पुरवठा निरीक्षक, पोलीस निरीक्षक, गॅस कंपनीचे अधिकारी व आर. टी. ओ. निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
      वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा होणार वापर टाळण्यासाठी वाहन रजिस्टर करतेवेळी देण्यातयेणार्‍या आर. सी. बुकमध्ये प्राधिकृत अ‍ॅटो गॅस पंपाद्वारे किती गॅस वाहनांमध्ये भरलेला आहे व किती पेट्रोल वापरले आहे याची नोंद करणे आवश्यक राहील असे सांगून श्री. देशमुख म्हणाले, हॉटेल, खानावळी यांनीही व्यावसायिक गॅस सिलेंडर घेणे बंधनकारक राहील. हॉटेलचा परवाना नुतनीकरण करतेवेळी हॉटेलने व्यावसायिक सिलेंडरच्या पुस्तकाची छायांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. वाहनांमध्ये अनाधिकृत गॅस किट तयार करण्यावर निर्बंध यावेत म्हणून गॅस कंपनीकडून पूर्वी ५ किलो वजनाची वितरित केलेली लहान गॅस सिलेंडर ग्राहकांनी ज्या त्या गॅस एजन्सीकडे परत करण्याची आहेत.
      मार्च २०१२ पासून शंभर टक्के घरपोच गॅस सिलेंडर देणे वितरकांवर बंधनकारक राहील असे सांगून श्री. देशमुख म्हणाले, एक गॅस सिलेंडर तसेच दोन गॅस सिलेंडरधारकांना घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येईल. रेशनकार्ड नसणार्‍या गॅसधारकांस १ मार्च २०१२ पासून गॅस सिलेंडर वितरित करता येणार नाही. त्याप्रमाणे एकाच कुटुंबातील सदस्य विभक्त राहत असल्यास त्याचा खात्रीलायक पुरावा सादर केल्यास सदर अर्जदारास फक्त गॅससाठी शुभ्र शिधापत्रिका देण्यात येईल.

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

विक्रीकराच्या थकबाकी वसुलीसाठी जाहीर लिलाव

         कोल्हापूर दि. १० : मे. डेअरी रिच फूडस, कोल्हापूर या भागीदारी फर्मकडून विक्रीकराच्या थकबाकी वसुलीसाठी त्यांची फॅक्टरी असलेला एक्स-२, एमआयडीसी, गोकुळ-शिरगांव हा प्लॉट, त्यावरील इमारत आणि तदंगभूत वस्तुंचा ३ जानेवारी २०१२ रोजी ठरविण्यात आलेला लिलाव तांत्रिक कारणामुळे ३० जानेवारी २०१२ रोजी करण्याचे ठरविले होते.
      तथापि ३० जानेवारी २०१२ रोजी जाहीर केलेला लिलाव पुनश्च तांत्रिक कारणामुळे तहकूब करण्यात आला. तरी हा लिलाव २९ फेब्रुवारी २०१२ रोजी होणार असून सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे विक्रीकर सहआयुक्त (व्हॅट प्रशा) कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांनी जाहीर निवेदनाद्वारे कळविले आहे.

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१२

बेरोजगार व उद्योजकांनी महा-ई-सेवा केंद्गांचा लाभ घ्यावा

        कोल्हापूर दि. ९ : शासनाने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गामार्फत दिल्या जाणार्‍या सेवा बेरोजगार व उद्योजकांना अधिक तत्पर आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने रोजगार विषयक सेवांचे विकेंद्गीकरण करुन शासन निर्णय निर्गमित केला आहे.
      इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी, शैक्षणिक पात्रता, अनुभव, संपर्क व पत्ता बदलणे, नोंदणीचे नुतनीकरण, दुय्यम ओळखपत्र देणे, संपर्क व पत्ता बदलून ओळखपत्र देण्याबरोबरच उद्योजकांकरिता नवीन आस्थापनेची नोंदणी करणे, ईआर-१ व ईआर-२ विवरणपत्रे सादर करणे या सेवा ३ जानेवारी २०१२ पासून अधिकृत महा-ई-सेवा केंद्गे, शासकीय आय. टी. आय., पॉलिटेक्नीक, इंजिनिअरिंग कॉलेजेस आदीमधून ऑनलाईन पध्दतीने सशुल्क उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
      कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहरी व ग्रामीण भागांसाठी स्पॅन्को लि. कंपनीच्या १२१ महा-ई-सेवा केंद्गामधून तसेच शासनाच्या जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमधूनही सशुल्क नोंदणी सेवा उपलब्ध आहेत.
      नवीन सुरु केलेल्या रोजगार विषयक सशुल्क सेवांचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगार व उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन कोल्हापूरचे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गाचे सहाय्यक संचालक गं. अ. सांगडे यांनी केले आहे.

अन्न पदार्थांची विक्री करणार्यां नी परवाना घेणे आवश्यक

          कोल्हापूर दि. ९ : कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कॅटरर्स, देशी-विदेशी दारु विक्रेते, बिअर शॉपी चालक, कंपन्यांच्या उद्योग समुहांच्या खानपान सेवा पुरविणारे कॅटरींग ठेकेदार किंवा कॅन्टीन, महाविद्यालये, विद्यापीठांचे कॅन्टीन्स चालक, शासकीय व निमशासकीय विद्यार्थी वसतिगृहासाठी खानपान सेवा पुरविणारे कॅन्टीन्स चालक, इस्पितळांतून रुग्णांसाठी व अन्य व्यक्तींना अन्न सेवा पुरविणारे कॅन्टीन्स चालक, शासकीय शालेय पोषण आहार सेवा पुरविणारे ठेकेदार आणि अन्न घटक पुरवठादार, विविध बचत गट, सर्व शासकीय कार्यालयासाठी खानपान सेवा पुरविणारे कॅन्टीन्स चालक उदा. कोर्ट कॅन्टीन्स आदी यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमावली २०११ नुसार परवाना घेणे आवश्यक आहे.
      संबंधितांनी विहित नमुन्यात अर्ज करुन विहित कागदपत्रासह शुल्क भरुन परवाना घेणे आवश्यक आहे. जो कोणी विक्रेता विना परवाना अन्न पदार्थांची विक्री करत असल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नुसार न्यायालयीन कारवाई व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
      तरी संबंधितांनी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, ८५२/८, रघुकुल, बी वॉर्ड, सुभाष रोड, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधून परवान्यासाठी / नोंदणीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहन कोल्हापूरचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाना अधिकारी व पदावधित अधिकारी स. बा. जानकर यांनी केले आहे.

मिथेलॉनचा वापर करणार्यां कडे परवाना असणे आवश्यक

        कोल्हापूर दि. ९ : महाराष्ट्र शासनाच्या २१ जानेवारी २०११ च्या अधिसुचनेनुसार मिथेनॉल हे विषारी द्गव्ये म्हणून अधिसूचित करण्यात आलेले आहे. त्यामुळे मिथेलॉनचा वापर करणार्‍या सर्व संबंधितांकडे महाराष्ट्र विषारी द्गव्ये नियम १९७२ अंतर्गत परवाना असणे आवश्यक आहे.
      तरी मिथेलॉनचा वापर करणार्‍यांनी परवाना घेण्यासाठी योग्य शुल्क व कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, ८५२/८, रघुकुल, बी वॉर्ड, सुभाष रोड, कोल्हापूर कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा. जर कोणी विनापरवाना मिथेलॉनचा वापर करताना आढळल्यास त्यांच्याविरुध्द नियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कोल्हापूरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नं. आ. यादव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

हासूर खुर्द व सावर्डे तर्फ असंडोली मतदान केंद्गावर १२ फेब्रुवारीला फेर मतदान

          कोल्हापूर दि. ९ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक-२०१२ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील  कागल  तालुक्यातील ३४/६८/३७ हासूर खुर्द व पन्हाळा तालुक्यातील १०/४७ सावर्डे तर्फ असंडोली या मतदान केंद्गावरील मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यावरुन राज्य निवडणूक आयोगाच्या  ८ फेब्रुवारी २०१२    ९ फेब्रुवारी २०१२  च्या आदेशानुसार  दि. ७  फेब्रुवारी  २०१२ रोजी झालेले मतदान हे निष्फळ झाले असल्याने या मतदान केंद्गावर फेर मतदान दि. १२ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी ७-३० ते सायं. ५-३० या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक, कोल्हापूर यांनी दिली आहे.

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

हातकणंगले तालुका हद्दीत प्रवेश करण्यास एकोणतीस जणांना मनाई आदेश

         कोल्हापूर दि. ८ : हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक चालू असल्याने या कालावधीत गंभीर स्वरुपाचा गुन्हा होऊन सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी संहिता कलम १४४ (२) नुसार हातकणंगले तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी २९ जणांना हातकणंगले तालुक्याच्या हद्दीत  दि. १ फेब्रुवारी २०१२ ते दि. ९ फेब्रुवारी २०१२ पर्यंत मतदानाचा दिवस ७ फेब्रुवारी २०१२ वगळता प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
      हातकणंगले तालुका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेल्या दखलपात्र गुन्हे दाखल असलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. निशांत अशोक एकांडे, बाळासाहेब कृष्णा निकम, चनाप्पा नचलु नेहरे, संजय देवगौंडा आवटे, संजय पांडुरंग बानदार, बाजीराव पांडुरंग बानदार, पोपट पांडुरंग बाणदार, शितल महादेव जाधव, राजेंद्ग सुरवशे, किसण शामराव तिरपणकर, निलेश बाळासाो कागले, गोगा ऊर्फ कृष्णात नरहरी बाणदार, अरुण दादासाो तिरपणकर, राजु मुरारी लंगु, सुकुमार सर्जेराव भोमान्ना, बिरदेर धुळा डावरे, बाळु नवलु नेहरे, नारायण धोंडीबा रामान्ना, धुळा यमाजी ढबु, गंगाराम बापु भोमान्ना, प्रकाश सत्तुजी पुजारी, परशुमार यशवंत डावरे, संजय ऊर्फ धुळा मुरारी लंगु, रामा बापू कुशाप्पा, धुळा धोंडीबा रामान्ना, राजु धुळा पुजारी, मुरारी यमाजी ढबु, रायगोंडा बापु डावरे, विलास भुपाल नेहरे.

हासूर खुर्द मतदान केंद्गावर १२ फेब्रुवारीला फेर मतदान

        कोल्हापूर दि. ८ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक-२०१२ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील  कागल  तालुक्यातील ३४/६८/३७ हासूर खुर्द या मतदान केंद्गावरील मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यावरुन राज्य निवडणूक आयोगाच्या ८ फेब्रुवारी २०१२ च्या आदेशानुसार दि. ७ फेब्रुवारी २०१२ रोजी झालेले मतदान हे निष्फळ झाले असल्याने या मतदान केंद्गावर फेर मतदान दि. १२ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी ७-३० ते सायं. ५-३० या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी दिली आहे.

सबला योजनेंतर्गंत किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण इच्छुकांनी अर्ज पाठवावेत

        कोल्हापूर दि. ८ : कोल्हापूर जिल्ह्यातील १६ प्रकल्पात केंद्ग पुरस्कृत सबला योजनेंतर्गंत किशोरवयीन मुलींना आहार, आरोग्य व जीवन कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्था, वैद्यकीय महाविद्यालये, होम सायन्स कॉलेज, आहार व आरोग्य तज्ञ, समाज कार्य महाविद्यालय, युनिसेफ प्रशिक्षण व इतर इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
        अर्जदार संस्थेकडे किमान चार महिला प्रशिक्षक असावेत व त्यांनी किमान २० अंगणवाड्यांचे क्षेत्र पहावे. शासनाने ठरविलेल्या दीपशिखा प्रशिक्षण कार्यक्रमाचा वापर करणे बंधनकारक राहील. दहा दिवसांच्या व ४० मुलींच्या निवासी प्रशिक्षण सत्रासाठी ऐंशी हजार रुपये एवढा ठराविक खर्च देण्यात येईल.
        अर्जदारांनी विहित नमुन्यात उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्याकडे १० दिवसांच्या आत अर्ज करावा. १६ प्रकल्पाचा तपशील, प्रशिक्षणाची सविस्तर माहिती, अर्जाचा नमुना आदी माहिती http://www.icds.gov.in/ या वेबसाईटवर तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) जिल्हा परिषद, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक ०२३१/२६६८११५, २६५७१९० आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत, असे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१२

त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. ३ : त्रिपुराचे राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दि. ५ फेब्रुवारी २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      रविवार दि. ५ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी ११ वाजल्यानंतर सांगलीहून मोटारीने कोल्हापुरकडे प्रयाण व मुक्काम.
      सोमवार दि. ६ फेब्रुवारी २०१२ रोजी घरगुती स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती.
      मंगळवार दि. ७ फेब्रुवारी २०१२ रोजी कोल्हापुरहून मोटारीने चिकोडी, जि. बेळगांवकडे प्रयाण व प्रकाश हुक्कीरे यांच्या कार्यक्रमास उपस्थिती. नंतर चिकोडीहून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.
      बुधवार दि. ८ फेब्रुवारी २०१२ रोजी उदय शिक्षण संस्थेचे संत शांती प्रकाश हायस्कूलच्या कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ८-३० वा. कोल्हापुरहून महालक्ष्मी एक्सप्रेसने पुण्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम राहील.

दुसर्याआ महायुध्दातील अनुदानधारकांनी हयातीचे दाखले जमा करावेत

         कोल्हापूर दि. ३ : कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरे महायुध्द अनुदानधारक लाभार्थी माजी सैनिक व विधवांनी हयातीचे दाखले अद्याप जमा केले नाहीत अशा सर्व लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले तातडीने आपापल्या बँकेत/सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे बँक खाते क्रमांक व शाखेचे नावासहित विनाविलंब जमा करावेत. अन्यथा माहे जानेवारी २०१२ पासून दरमहा मिळणारे वाढीव अनुदान तीन हजार रुपये बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.

मोन्युमेंट अटेंन्डट पदासाठी कंत्राटी पध्दतीने जागा माजी सैनिकांनी अर्ज करावेत

          कोल्हापूर दि. ३ : माजी सैनिकांमधून आर्चिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल मुंबई, साईन फोर्ट, साईन (ई), मुंबई येथे मोन्युमेंट अटेंन्डट पदासाठी कंत्राटी पध्दतीने जागा भरावयाच्या आहेत. यासाठी वेतन सर्व मिळून दहा हजार रुपये आहे. इच्छुक माजी सैनिकांनी अर्ज भरुन पाठवावेत. अधिक माहितीसाठी व विहित नमुन्यातील अर्जासाठी कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.

खत विक्रेत्यांनी रासायनिक खत पुरवठ्यासाठी एमएफएमएस नोंदणी १४ फेब्रुवारीपर्यंत करावी

        कोल्हापूर दि. ३ : कोल्हापूर जिल्ह्यात एमएफएमएस (मोबाईल फर्टिलायझर मॉनिटरींग सिस्टीम) केंद्ग शासनाच्या निर्देशानुसार सुरु झाली आहे. यापुढे कृषि सेवा केंद्गांना रासायनिक खत पुरवठा हा रासायनिक खत सनियंत्रण प्रणाली (एमएफएमएस) द्वारेच केला जाणार आहे.
        कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना सप्टेंबर व नोव्हेंबर २०११ मध्ये प्रशिक्षण देण्यात आले असून एमएफएमएस नोंदणीबाबत सुचित करण्यात आले होते. तसेच १४ जानेवारी २०१२ अखेर वाढीव मुदत देवूनही जिल्ह्यातील १८८५ रासयानिक खत विक्रेत्यांपैकी केवळ १२४४ विक्रेत्यांनीच नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विक्रेत्यांनाच भविष्यात खत पुरवठा होणार असल्याची जाणीव करुन देखील कांही विक्रेत्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. तसेच कांही विक्रेत्यांनी केवळ सुक्षम मुलद्गव्य व पाण्यात विद्गाव्य खतांची विक्री करणार या सबबीखाली नोंदणी केलेली नाही असे निदर्शनास आले आहे. मात्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व परवानाधारक खत विक्रेत्यांनी नोंदणी करणे सक्तीचे केले आहे.
      शासनामार्फत १४ फेब्रुवारी २०१२ पर्यंत पुनःश्च मोबाईल एमएफएमएस नोंदणीकरिता अंतिम मुदतवाढ दिलेली असून सर्व विक्रेत्यांनी नोंदणी पूर्ण करावी. अन्यथा ज्या विक्रेत्यांनी नोंदणी केलेली नाही अशा सर्व विक्रेत्यांना कृषि विकास अधिकारी कार्यालय स्तरावरुन परवाने रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी. ज्या विक्रेत्यांनी नोंदणीसाठी अपुरी माहिती सादर केल्याने माहिती स्विकृत होऊ शकली नाही अशांनी तात्काळ माहितीसह संबंधित तालुक्यांना नेमून दिलेल्या कंपनीच्या प्रतिनिधीकडे संपर्क साधून एमएफएमएस नोंदणी पूर्ण करावी. तसेच इतर विक्रेत्यांनीही माहिती स्विकृत झाली किंवा नाही याची शहानिशा करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुरेश मगदूम यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
एमएफएमएस नोंदणी स्विकृत झालेल्या विक्रेत्यांना केंद्ग शासनामार्फत त्यांच्या मोबाईलवर रासायनिक खत विक्री व्यवहाराच्या सोयीसाठी सांकेतीक नंबर देण्यात येत असून याचीही खातर जमा संबंधितांनी करावी असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

शहर व तालुक्यांसाठी माहे फेब्रुवारीकरिता योजनानिहाय धान्य वाटप

        कोल्हापूर दि. ३ : कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी आणि तालुक्यांसाठी फेब्रुवारी २०१२ महिन्याकरिता खालीलप्रमाणे योजनानिहाय धान्य वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. योजनानिहाय मंजूर नियतन पुढीलप्रमाणे असून आकडे क्विंटलमध्ये आहेत.
       कोल्हापूर - नियमित बीपीएल- गहू १७११, तांदूळ साठा शिल्लक आहे, नियमित एपीएल- गहू ८६५५, तांदूळ १६१५, नियमित अंत्योदय- गहू ७०५, तांदूळ साठा शिल्लक आहे, अतिरिक्त बीपीएल- गहू- ६०७, तांदूळ साठा शिल्लक आहे, अन्नपूर्णा- गहू १५, करवीर - नियमित बीपीएल- गहू २२७८, तांदूळ साठा शिल्लक आहे, नियमित एपीएल- गहू ४९६०, तांदूळ ८१५, नियमित अंत्योदय- गहू ४२५, तांदूळ साठा शिल्लक आहे,अतिरिक्त बीपीएल- गहू- ८०९, तांदूळ साठा शिल्लक आहे, अन्नपूर्णा- गहू ४०, पन्हाळा- नियमित बीपीएल- गहू २८९८, तांदूळ २४३४, नियमित एपीएल- गहू २१८५, तांदूळ ३५७, नियमित अंत्योदय- गहू ९८८, तांदूळ ७१९, अतिरिक्त बीपीएल- गहू- १०२९, तांदूळ ७०६, अन्नपूर्णा- गहू ६९, हातकणंगले - नियमित बीपीएल- गहू ३२६४, तांदूळ २७१०, नियमित एपीएल- गहू ४८९०, तांदूळ ८००, नियमित अंत्योदय- गहू १०२६, तांदूळ ७५३, अतिरिक्त बीपीएल- गहू- ११६०, तांदूळ ८२७, अन्नपूर्णा- गहू ७७, इचलकरंजी - नियमित बीपीएल- गहू १९५१, तांदूळ १७२०, नियमित एपीएल- गहू ३९२२, तांदूळ ६४२, नियमित अंत्योदय- गहू साठा शिल्लक आहे, तांदूळ साठा शिल्लक आहे, अतिरिक्त बीपीएल- गहू- ६९३, तांदूळ ३९३, अन्नपूर्णा- गहू २४, शिरोळ - नियमित बीपीएल- गहू २४९७, तांदूळ २१३२, नियमित एपीएल- गहू ४३३८, तांदूळ ७१०, नियमित अंत्योदय- गहू साठा शिल्लक आहे, तांदूळ ७१७, अतिरिक्त बीपीएल- गहू- ८८७, तांदूळ ५७४, अन्नपूर्णा- गहू २०, कागल - नियमित बीपीएल- गहू ३०८९, तांदूळ २५७८, नियमित एपीएल- गहू २७८०, तांदूळ ४५५, नियमित अंत्योदय- गहू ९००, तांदूळ साठा शिल्लक आहे, अतिरिक्त बीपीएल- गहू- १०९७, तांदूळ ७६९,  अन्नपूर्णा- गहू २३, शाहूवाडी- नियमित बीपीएल- गहू २०४०, तांदूळ १७९५, नियमित एपीएल- गहू १८४१, तांदूळ ३०१, नियमित अंत्योदय- गहू ६६३, तांदूळ ५२०, अतिरिक्त बीपीएल- गहू- ७२४, तांदूळ ४१८, अन्नपूर्णा- गहू २६, गगनबावडा- नियमित बीपीएल- गहू २००, तांदूळ १५१, नियमित एपीएल- गहू २७२, तांदूळ ४४, नियमित अंत्योदय- गहू १९८, तांदूळ १४८, अतिरिक्त बीपीएल- गहू- ७१, तांदूळ ६६, अन्नपूर्णा- गहू ९, राधानगरी - नियमित बीपीएल- गहू २६६९, तांदूळ २३१२, नियमित एपीएल- गहू २००३, तांदूळ ३२८, नियमित अंत्योदय- गहू ८७६, तांदूळ ६५७, अतिरिक्त बीपीएल- गहू- ९४८, तांदूळ ५८२, अन्नपूर्णा- गहू ५९, गडहिंग्लज- नियमित बीपीएल- गहू १९११, तांदूळ १७४१, नियमित एपीएल- गहू २७३५, तांदूळ ४४८, नियमित अंत्योदय- गहू १३१५, तांदूळ ९८६, अतिरिक्त बीपीएल - गहू - ६७९, तांदूळ ३३२, अन्नपूर्णा - गहू ३५,  आजरा - नियमित  बीपीएल - गहू १०२५, तांदूळ १०७२, नियमित एपीएल- गहू ११९०, तांदूळ साठा शिल्लक आहे, नियमित अंत्योदय- गहू ८३९, तांदूळ ६३०, अतिरिक्त बीपीएल- गहू - ३६४, तांदूळ ३८, अन्नपूर्णा - गहू १३, चंदगड - नियमित बीपीएल- गहू १५०५, तांदूळ १४३५, नियमित एपीएल- गहू १६५१, तांदूळ २७०, नियमित अंत्योदय- गहू १११०, तांदूळ साठा शिल्लक आहे, अतिरिक्त बीपीएल- गहू- ५३५, तांदूळ १९७, अन्नपूर्णा- गहू ४१, भुदरगड - नियमित बीपीएल- गहू १९९२, तांदूळ १८००, नियमित एपीएल- गहू १४९८, तांदूळ २४५, नियमित अंत्योदय- गहू ७७५, तांदूळ ५८०, अतिरिक्त बीपीएल- गहू- ७०७, तांदूळ ३५८, अन्नपूर्णा- गहू ४१.