कोल्हापूर,
दि. 1 (जिमाका)- हातकणंगले येथील 37
वर्षाच्या मृत तरुणाचा तसेच कदमवाडी येथील
85 वर्षांच्या मृत महिलेचा कोरोना बाबतचा अहवाल आज निगेटिव्ह आला असल्याची माहिती
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
हातकणंगले
येथील 37 वर्षाच्या तरुणास सी. पी. आर हॉस्पीटल मध्ये 31 मार्च रोजी पहाटे 2.30
वाजता या तरुणास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यास श्वसनाचा गंभीर त्रास,
तसेच निमोनिया व सेपसिस निष्पण झाला. त्यांचा बाधित देशात, शहरात प्रवास झालेला नव्हता तसेच कोणत्याही
कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क झाल्याचा इतिहास नव्हता. तरीही सध्याची कोरोना साथ
लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्याचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पुणे येथे
पाठविण्यात आला होता.
हा रुग्ण गंभीर असल्याने त्याच्यावर
उपचार सुरु असताना काल सकाळी 11-30 वा त्याचा मृत्यू झाला. त्याचा अहवाल आज
निगेटिव्ह आला.
कदमवाडी येथील 85 वर्षांच्या महिलेला येथील डॉ.
डी. वाय. पाटील हॉस्पीटल मध्ये 26 मार्च रोजी मध्यरात्री 1 वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना
श्वसनाचा गंभीर त्रास, तसेच रक्तदाब व तीव्र अडथळा आणणारा फुफ्फुसाचा रोग (सी. ओ.
पी. डी.) निष्पण झाला. तसेच त्यांना यापूर्वीच रक्तदाब असल्याने त्या उपचार घेत
होत्या. त्यांचा बाधित देशात, शहरात
प्रवास झालेला नव्हता तसेच कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क झाल्याचा
इतिहास नव्हता. तरीही रुग्णाचे वय विचारात घेवून तसेच सध्याची कोरोना साथ लक्षात
घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात
आला होता. हा रुग्ण गंभीर असल्याने त्यांच्यावर
उपचार सुरु असताना काल सकाळी 7-15 वा त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अहवाल आज
निगेटिव्ह आला.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.