मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

मायक्रो फायनान्सच्या तक्रारींसाठी 18001021080 क्रमांकावर संपर्क करा -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 


                                                                      

कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): मायक्रो फायनान्स कंपनीबाबत तक्रार निवारणासाठी ग्राहकांनी 18001021080 या टोल फ्री क्रमांकावर आपल्या तक्रारी कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे मदतीच्या विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. रिजर्व बँक ऑफ इंडियाव्दारे ग्राहकांना त्यांच्या कर्जाचे हप्ते भरण्यास ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत सर्व बँका व वित्तीय संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. विविध बँका व वित्तीय संस्थांमार्फत रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या सवलतीची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. तरी काही ग्राहकांची विविध मायक्रो फायनान्स कंपनीबद्दल तक्रारी आढळून येत आहेत. तसेच ग्राहकांमध्ये तक्रारींचे निवारणाबाबत संभ्रम दिसून येत आहे. ही सुविधा मराठी भाषेमध्येसुध्दा उपलब्ध असल्याने सर्व ग्राहकांनी या क्रमांकावर आपल्या तक्रारी नोंद कराव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.