46 व्हेंटीलेटर्स, 13 हायफ्लो नेजल ऑक्सिजन,47 एनआयव्ही
वैद्यकीय अधिक्षक डॉ. राहूल बडे यांची माहिती
कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): प्रकाश
पद्माना कांबळे (वय 69 रा. निपाणी, जि. बेळगाव) यांना 10 लिटर ऑक्सिजन प्रति मिनिट
या प्रमाणात सुरु करुन आवश्यक ते सर्व औषधोपचार सुरु करण्यात आले होते. परंतु, उपचारास
प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. आवश्यक ते सर्व उपचार सीपीआरमधून
देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. राहूल बडे यांनी दिली
कोरोना संशयित प्रकाश कांबळे यांची निपाणी येथे
केलेली रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट ही निगेटिव्ह आलेली होती. त्यांना दिनांक 30 ऑगस्ट
रोजी दुपारी 1.39 वाजता सीपीआर रुग्णालयामध्ये वेदगंगा, पहिला मजला येथे दाखल
करण्यात आले होते. त्यांना दम लागणे व खोकला येणे या प्रकारची लक्षणे पाच
दिवसापासून होती तसेच मधुमेहचा आजार होता.
रुग्णालयात दाखल करतेवेळी त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाणे 82 टक्के (कमी प्रमाण)
होते. त्यांना ऑक्सिजन 10 लिटर प्रति मिनिट या प्रमाणात सुरु करुन आवश्यक ते सर्व
औषधोपचार सुरु करण्यात आलेले होते.
त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने
त्यास नॉन इन्हेसिव व्हेंटीलेटर देखील जोडण्यात आला. परंतु त्यांनी उपचारास
प्रतिसाद न दिल्याने त्यांचा दिनांक 31 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता मृत्यू झाला.
रुग्णास आवश्यक ते सर्व उपचार देण्यात आले होते, असे डॉ. बडे यांनी सांगितले.
46 व्हेंटीलेटर्स, 13 हायफ्लो नेजल ऑक्सिजन,47 एनआयव्ही
सीपीआर रुग्णालयात सुमारे 400 गंभीर स्वरुपाचे
रुग्ण उपचार घेत आहेत. सद्यस्थितीत सीपीआरमध्ये 81 व्हेंटीलेटर्स उपलब्ध असून
त्यापैकी सुस्थितीत असलेले 46 व्हेंटीलेटर्स, 13 High Flow Nasal Oxygen System
आणि 47 NIV (नॉन इन्हेसिव व्हेंटीलेटर) विविध वॉर्डमध्ये रुग्णांसाठी उपलब्ध करुन
देण्यात आलेली आहेत. तसेच कोरोना काळात देणगी स्वरुपात मिळालेल्या एकूण
व्हेंटीलेटर्स पैकी 8 व्हेंटीलेटर्स रुग्णसेवेकरिता उपलब्ध करुन देण्यात आलेले
आहेत. उर्वरित 16 व्हेंटीलेटर्स लवकरच कार्यान्वित करण्यात येतील.
सद्या रुग्णालयात 90 आयसीयू बेड आहेत. हे व्हेंटीलेटर्स
आयसीयू विभागा खेरीज इतर विभागांमध्ये देखील गरजेनुसार रुग्णांसाठी उपलब्ध करुन
देण्यात येत असतात. त्यासाठी रुग्णांची एकंदर परिस्थिती हा एकमेव निकष लावण्यात
येतो व परिस्थिती सुधारल्यानंतर रुग्णास वॉर्डात किंवा स्टेप डाऊन अतिदक्षता
विभागात स्थलांतरित करण्यात येत असेही डॉ. बडे यांनी सांगितले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.