बुधवार, ९ जून, २०२१

आजअखेर 1 लाख 10 हजार 236 जणांना डिस्चार्ज

 

   कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2959 प्राप्त अहवालापैकी 2420 अहवाल निगेटिव्ह तर 497 अहवाल पॉझिटिव्ह (42 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 4065 प्राप्त अहवालापैकी 3514 अहवाल निगेटिव्ह तर 551 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1397 प्राप्त अहवालापैकी 926 निगेटिव्ह तर 471 पॉझीटिव्ह  असे एकूण 1519 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकूण 31 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 26 हजार 793 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 10 हजार 236 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 12 हजार 528 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1519 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-53, भुदरगड-35, चंदगड-30, गडहिंग्लज-51, गगनबावडा-7, हातकणंगले-179, कागल-40,  करवीर-339, पन्हाळा-100, राधानगरी-33, शाहूवाडी-4, शिरोळ-52, नगरपरिषद क्षेत्र-153, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 407, इतर जिल्हा व राज्यातील-36 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-2938, भुदरगड- 3485, चंदगड- 2940, गडहिंग्लज- 4721, गगनबावडा- 544, हातकणंगले-13595, कागल-4054, करवीर-16493, पन्हाळा- 5887, राधानगरी-2578, शाहूवाडी-3004, शिरोळ- 7811, नगरपरिषद क्षेत्र-15275, कोल्हापूर महापालिका 36 हजार 009 असे एकूण  1 लाख 19 हजार 334 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 7 हजार 459 असे मिळून एकूण 1 लाख 26  हजार 793 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 26 हजार 793 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 10 हजार 236 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 4 हजार 029 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 12 हजार 528 इतकी आहे.

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.