कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय)
: जिल्ह्यातील राधानगरी धरणात 80.55 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार
राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम,
सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, खडग कोगे
व सरकारी कोगे, तुळशी नदीवरील बाचणी, आरे व बीड, कासारी नदीवरील यवलूज, ठाणे आळवे व पुनाळ तिरपण, कुंभी
नदीवरील कळे, वारणा नदीवरील
चिंचोली, माणगाव, कोडोली, खोची, तांदूळवाडी, चावरे, शिगांव व दानोळी, दुधगंगा नदीवरील सिंध्दनेर्ली, सुळकुड,
बाचणी व दत्तवाड, वेदगंगा नदीवरील
निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरूपली, चिखली व शेणगाव, हिरण्यकेशी
नदीवरील साळगाव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ व हरळी, घटप्रभा
नदीवरील कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली व अडकूर, ताम्रपर्णी नदीवरील हल्लारवाडी, चंदगड व कुर्तनवाडी असे एकूण 52 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या
कोयना धरणात 37.92 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 38.421 इतका पाणीसाठा आहे.
आपल्या
जिल्ह्यातील धरणांमध्ये
पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 51.33 दलघमी, वारणा 478.62 दलघमी, दूधगंगा 257.08
दलघमी, कासारी 28.97 दलघमी, कडवी 30.35 दलघमी, कुंभी 36.25 दलघमी, पाटगाव 50.57
दलघमी, चिकोत्रा 20.58 दलघमी, चित्री 29.02 दलघमी, जंगमहट्टी 13.35 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 12.61, कोदे
(ल.पा) 4.24 दलघमी तर जांबरे मध्यम प्रकल्प दि. 18 जून रोजी दु. 2.45 वा. पूर्ण
क्षमतेने भरला आहे.
तसेच
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 33.8 फूट, सुर्वे 32.9 फूट, रुई
63.3 फूट, इचलकरंजी 59.3 तेरवाड 53 फूट, शिरोळ 48 फूट, नृसिंहवाडी 47.6 फूट,
राजापूर 34.6 फूट तर नजीकच्या सांगली 20 फूट व अंकली 25.3 फूट अशी आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.