बुधवार, ९ जून, २०२१

गवत विक्रीकरिता दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारित महासैनिक दरबाल हॉल परिसरातील पडसर जमिनीतील गवताची सन 2021 करिता विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी प्रत्यक्ष पहाणी करून आपली दरपत्रके सिलबंद लिफाफ्यात घालून 21 जून रोजी सकाळी 11 वा. पर्यंत जिल्हा सैनिक  कल्याण कार्यालय येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रदीप ढोले यांनी केले आहे.

प्राप्त सीलबंद लिफाफ्यातील जास्तीत-जास्त रक्कम असणाऱ्या दरपत्रकास मान्यता देण्यात येईल. अधिक माहितीकरिता कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 0231-2666185 वर संपर्क साधावा.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.