कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती
कार्यालय) : सन 2021-22 या चालू शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमास सीईटी व्दारे
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज विहीत
कालावधीत समिती कार्यालयास सादर करण्याचे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी
समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सचिन साळे यांनी केले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाने क्रेंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरिता
आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. केंद्रीभूत प्रवेश
प्रक्रियेतून व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्ष एच.एस.सी.
औषध निर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केंटरिंग टेक्नॉलॉजी पदवी, प्रथम वर्ष
वास्तुशास्त्र, बी.प्लॅनींग पदवी अभ्यासक्रम, प्रथम वर्ष एम.ई./ एम.टेक. एम. फार्म
डी., एम. आर्किटेक्चर, एम. प्लॅनींग, एम. एचएमसीटी, एमबीए/एमएमएस, एमसीए प्रवेश
घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी/ अर्जदारांनी विहीत कालावधीत जात प्रमाणपत्र
पडताळणीचा अर्ज समिती कार्यालयास सादर करावा.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.