कोल्हापूर,
दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय): २१ जून रोजी जागतिक योग दिनाचे सार जाणून घेण्यासाठी पोस्ट विभाग (किंवा इंडिया पोस्ट) विशेष कॅन्सलेशन शिक्यासह येत आहे. हा अनोखा उपक्रम २०२१ च्या ७ व्या
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भारतीय पोस्टाने भारत भरातील ८१० प्रमुख पोस्ट
ऑफिसच्या माध्यमातून सचित्र रचनेद्वारे हा विशेष कॅन्सलेशन शिक्का जारी करण्यात येणार आहे. हा उपक्रम आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या एकाचवेळी फिटेलिक स्मरणार्थांपैकी एक ठरणार
आहे.
सर्व डिलिव्हरी आणि नॉन-डिलीव्हरी हेड पोस्ट ऑफिस २१ जून २०२१ रोजी कार्यालयात
बुक केलेल्या सर्व टपालावर हा विशेष कॅन्सलेशन शिक्का उमटवतील.आंतरराष्ट्रीय योग दिन २०२१ मध्ये ग्राफिकल डिझाइनसह
शास्त्रीय रचनेचा ठसा किंवा चिन्ह हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषामध्येअसेल.
कॅन्सलेशन शिक्का म्हणजे डाक चिन्हांकित म्हणून वापरले जाते. ज्याचा वापर
मुद्रांक पुन्हा वापरण्यापासून रोखण्यासाठी व मुद्रांक रद्द करण्यासाठी वापरला जातो. असले कॅन्सलेशन शिक्के हे बहुतेक फिलेटिक अभ्यासाचे विषय असतात.
वर्षानुवर्षे, मुद्रांक संकलनाची आवड कमी झाली आहे आणि या छंद किंवा कलेला पुन्हा जिवंत
करण्यासाठी इंडिया पोस्ट ने फिलिटिस्टसाठी एक योजना चालविली आहे. ते फिलाटेलिक
ब्युरोमधील संग्रहक आणि नियुक्त केलेल्या पोस्ट ऑफिसमधील काउंटरसाठी शिक्के
घेतात. देशातील कोणत्याही मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये २०० रुपये जमा करुन फिलेटिक खाते
सहजपणे उघडता येते आणि शिक्के व विशेष कव्हर यासारख्या वस्तू मिळू शकतात.
याव्यतिरिक्त, स्मारक
तिकिटे फक्त फिल्टेलिक ब्युरो आणि काउंटरवर किंवा फिलाटेलिक खाते योजना अंतर्गत
उपलब्ध आहेत. ते मर्यादित प्रमाणात छापले जातात.
योग आणि आय. डी. वाय. हे वर्षानुवर्षे फिलेटिक स्मारकांसाठी लोकप्रिय विषय आहेत. २०१५मध्ये, पोस्ट विभागाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी दोन शिक्क्यांचा संच आणि एक लघु पत्रक प्रसिध्द केले. २०१६ मध्ये माननीयपंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृती दिनानिमित्त सूर्य नमस्कारावरील स्मारक टपाल तिकिटे जाहीर केली. २०१७ मध्ये, यूएन पोस्टल प्रशासन (यू. एन. पी. ए.) ने न्यूयॉर्कमधील आंतरराष्ट्रीय योग दिनाचे स्मरण करण्यासाठी १० योग आसन दर्शविणाऱ्या शिक्क्यांचा संच जारी केला.
आय. डी. वाय. गेल्या सहा वर्षात जगभरात (अनेकदा सर्जनशील) प्रकारे साजरे केले जाते. भारतात पूर्वीच्या अनेक सुंदर चित्रांमध्ये योग दिनाच्या अनोख्या उत्सवांचे चित्रण केले आहे. यामध्ये हिमालयातील बर्फाळ भागात योगाभ्यास करणारे भारतीय सैन्य कर्मचारी, नौदल अधिकारी व निर्णायक आय.एन.एस. विराटवर योग करणारे कॅडेट्स, आय. डी. वाय. मेसेजिंगद्वारे वाळू शिल्प तयार करणे, भारतीय नौदलाच्या पाणबुडी आयएनएस 'सिंधुरत्न' इत्यादी योगासने करणारे भारतीय नौदलाचे अधिकारी यांचा समावेश आहे. सध्याचेफिलाटेलीस्टआय. डी. वाय. साजरा करण्याच्या विविधतेत भर घालत असल्याचेही टपाल विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.