कोल्हापूर, दि. 22 (जि.मा.का.) :पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना (मृग व आंबिया बहार) सन 2021-22 मध्ये राबविण्यास शासन मान्यता दिली आहे. मृग बहारात जिल्ह्यात पेरु, सातारा जिल्ह्यात डाळिंब तर सांगली जिल्ह्यात पेरू, चिकू, डाळींब, लिंबू व द्राक्षे या फळपिकासाठी तर आंबिया बहारात जिल्ह्यात द्राक्षे, केळी आंबा व काजू, सातारा जिल्ह्यात द्राक्षे, डाळिंब, केळी, आंबा व स्ट्रॉबेरी व सांगली जिल्ह्यात द्राक्षे, डाळिंब, केळी व आंबा तर या फळपिकासाठी अधिसुचीत महसुल मंडळामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.
कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यासाठी एच.डी.एफ.सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीची योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा म्हणून निवड करण्यात आली आहे.
या फळपिकांकरीता प्रती
हेक्टरी विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता आणि योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत खालीलप्रमाणे आहे.
फळपिक |
विमा संरक्षित रक्कम (रु./हे) |
शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (रु./हे) |
अंतिम मुदत |
मृग बहार |
|||
पेरु |
60,000/- |
3000/- |
30-06-2021 |
चिकू |
60,000/- |
3000/- |
30-06-2021 |
डाळींब |
1,30,000/- |
6500/- |
14-07-2021 |
लिंबू |
70,000/- |
6300/- |
30-06-2021 |
द्राक्षे |
3,20,000/- |
16,000/- |
30-06-2021 |
आंबिया बहार |
|||
द्राक्षे |
3,20,000/- |
16,000/- |
15-10-2021 |
डाळिंब |
1,30,000/- |
सांगली -13,000/- |
14-01-2022 |
केळी |
1,40,000/- |
सांगली, सातारा -7000/- |
31-10-2021 |
कोल्हापूर - 11,200/- |
|||
आंबा |
1,40,000/- |
सांगली - 16,100/- |
31-12-2021 |
सातारा - 10,500/- |
|||
कोल्हापूर - 14,000/- |
|||
काजू |
1,00,000/- |
9,000/- |
30-11-2021 |
स्ट्रॉबेरी |
2,00,000/- |
20,000/- |
14-10-2021 |
आंबिया बहारामध्ये अतिरिक्त विमा हप्ता भरून गारपीटीपासून विमा संरक्षण घेता येईल. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपाची असून कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे नसल्यास अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर तसे घोषणापत्र संबंधित बॅकेस/वित्तीय संस्थेस देणे बंधनकारक आहे.
योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या प्राधिकृत बँका / प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी पतसंस्था / संबंधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधींशी संपर्क साधून अथवा पिक विमा संकेतस्थळ किंवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे विहित प्रपत्रात विमा प्रस्ताव योग्य त्या विमा हप्त्यासह तसेच आवश्यक त्या कागदपत्रांसह विहीत वेळेत सादर करावेत.
अर्जदाराने अर्जासोबत आधार कार्ड/आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतक-यांचा करारनामा/सहमती पत्र, घोषणापत्र आणि बँक पासबुकाची प्रत इ. कागदपत्रे सादर करून प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तसेच मंडळ कृषि अधिकार, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा अथवा संबंधित जिल्हयाच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक उमेश पाटील यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.