कोल्हापूर,
दि. ९ (जिल्हा माहिती कार्यालय): 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याबाबत जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांची जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत दूरदृश्यप्रणालीव्दारे
बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी कोविड 19 ची परिस्थिती तसेच ऑक्सिजनची गरज व त्यानुषंगाने असणारी आपली जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक संस्थेस किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. ‘‘एक प्रशिक्षण संस्था एक झाड’’ या आवाहनास प्रतिसाद देत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संस्था स्तरावर वृक्षारोपण करुन विविध कार्यक्रम राबविले.
यामध्ये कार्यालयातील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी श्रीमती अ.मु.पवार, कनिष्ठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी प्र.भि.कदम व कौशल्य संस्थेचे संस्थाचालक तसेच संजय घोडावत प्रशिक्षण संस्थेचे व अन्य संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ऑनलाईन सभेस उपस्थित राहिल्याबद्दल जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी श्रीमती शेख यांनी आभार मानले. सर्व संस्था चालकांनी संस्थेच्या आवारात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.