मंगळवार, ८ जून, २०२१

तृतीयपंथीयांना देण्यात येणार लस

 


कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांन लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे वेळोवेळी करण्यात येते. नागरिकांनी याला प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. समाजातील उपेक्षित घटक म्हणून तृतीयपंथीयांकडे पाहिले जाते. तथापि हा घटक लसीकरणा अभावी वंचित राहू नये यासाठी त्यांनाही लस देण्यात येणार आहे.

 जिल्हयामधील सर्व तृतीयपंथीयांना कोविड-19 लस देण्याबाबत तसेच लस देताना तृतीयपंथीयांकडून आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड व पॅनकार्ड इत्यादी कोणतेही ओळखपत्र त्यांच्याकडे नसले तरी संबंधितांनी कोणत्याही ओळखपत्राची त्यांच्याकडे मागणी करू नये. तृतीयपंथीयांना कोविड-19 लस देण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, असे निर्देश जिल्हा तक्रार निवारण समिती अध्यक्ष तथा  जिल्हाधिकारी  दौलत देसाई यांनी दिले.  

या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याबाबत जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, जिल्हा शल्यचिकीत्सक, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव विशाल लोंढे यांनी दिली.

0000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.