बुधवार, १६ जून, २०२१

झीरो बॅलन्स अकाऊंट - ऑटोरिक्षा परवाना धारकांना आवाहन

 



        कोल्हापूर दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): ऑटो रिक्षा परवाना धारकांसाठी शासनाने १५०० रूपये इतके अनुदान जाहीर केले आहे.या अनुदानाचा फायदा जिल्हयातील ८५०० हून अधिक ऑटो रिक्षा परवाना धारकांनी घेतला आहे.ऑटोरिक्षा परवानाधारकांना बॅंक अकाऊंटमध्ये कमीत कमी बॅलन्स ठेवण्यावरून अडचणी येत असल्याचे लक्षात आल्याने, पोस्टामध्ये हे अकाउंट झिरो बॅलन्स अकाउंट असल्यामुळे संबंधिताच्या खात्यामध्ये पैसे शिल्लक राहण्याची आवश्यकता नाही. ऑटोरिक्षा परवानाधारकांना त्यांचे अकाउंट मोबाईल, आधार क्रमांक लिंक करण्याची सुविधा पोस्टामध्ये उपलब्ध होईल .या संधीचा फायदा रिक्षा परवानाधारकांनी घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस आणि वरिष्ठ पोस्ट अधीक्षक श्री सोनवले यांनी केले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.