कोल्हापूर, दि. ९ (जिल्हा
माहिती कार्यालय): राज्यातील ऑटोरिक्षा
परवानाधारकांना राज्य सरकारने देऊ केलेले 1500 रूपये अनुदान त्यांच्या खात्यामध्ये
जमा करण्याची कार्यवाही सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यात 7500 हून अधिक रिक्षा
परवानाधारकांनी याचा लाभ घेतला आहे.
कोरोना कालखंडात काही ऑटोरिक्षा परवाना धारकांना मोबाईल व आधार कार्ड लिंक करण्यासाठी अडचणी येत असल्याने
ही अडचण लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोबाईल व आधार कार्ड लिंकच्या
कामाबाबत पोस्ट विभागाला विनंती केली. ती विनंती पोस्ट विभागाने मान्य केली. ही सुविधा
जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असून या संदर्भात ऑटो रिक्षाचालकांनी
नजीकच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यावी. पोस्ट निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी या कामी
उत्स्फूर्तपणे मदत केली. लवकरच ही सुविधा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्येही सुरू
करण्यात येणार आहे. पोस्टाच्या सुविधेचा लाभ जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा धारकांनी
घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.