कोल्हापूर, दि.
24 (जिल्हा माहिती कार्यालय) : राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत
मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हे प्रशिक्षण मोफत दिले जाणार असून जिल्ह्यातील
आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या किंवा यापूर्वी आरोग्य
क्षेत्रात काम केलेल्या इच्छुक युवक-युवतींनी या योजनेचा
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्रांचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत
जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी,
आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या
किंवा यापूर्वी आरोग्य क्षेत्रात काम केलेल्या 18 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवक-युवतींना
हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिंग, डोमेस्टिक हेल्थकेअर वर्कर इ. क्षेत्रामधील विविध कोर्सेसचे
मोफत प्रशिक्षण, कौशल्य विकसित करून, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा
उद्देश आहे.
मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेअंतर्गत विविध 36 प्रकारच्या अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षण दिले जाणार असून हे प्रशिक्षण प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून दिले जाईल. सर्व प्रशिक्षणार्थींनी किमान सहा महिने शासकीय किंवा खासगी रुग्णालयामध्ये सेवा देणे अनिवार्य आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यामधील ग्रीन चॅनेलद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून नोंद झालेल्या शासकीय रुग्णालय किंवा 20 पेक्षा जास्त बेडची संख्या असणाऱ्या खासगी रुग्णालयामार्फत दिले जाईल. उमेदवारांसाठी प्रशिक्षण पूर्णपणे निशुल्क आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोना योद्ध्यांची मोठी साखळी निर्माण करण्यास मदत होणार आहे. मोफत प्रशिक्षणाकरिता जास्तीत-जास्त इच्छुक उमेदवारांनी आपली माहिती https://forms.gle/gBfxSv7DtBjQ4vhH7 या लिंकच्या आधारे नोंदवावी.
अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र, 0231-2545677 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी आपली नावे प्रशिक्षणाकरिता नोंदवावी.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.