शुक्रवार, ११ जून, २०२१

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या राजर्षि छत्रपती शाहू पुरस्काराची निवड यादी जाहीर

 


कोल्हापूर, दि. 11 : (जिल्हा माहिती कार्यालय) :   जिल्हा परिषद कर्मचारी (वर्ग 3) मधील (ग्रामसेवक व शिक्षक सोडून) इतर संवर्गातील  16 कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेकडू राजर्षि छत्रपती शाहू पुरस्कारासाठी (2020-21) निवड करण्या आली आहे.

प्रतिवर्षी राजर्षि छत्रपती शाहू जयंतीच्या निमित्ताने पुरस्कारासाठी निवड करण्या आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना  गौरवचिन्ह, प्रशस्तीपत्र श्रीफळ देवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहपत्नीक/पतीसह  सन्मानित करण्यात येते.   या पुरस्काराची निवड आज झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतिश पाटील, शिक्षण अर्थ समिती सभापती प्रविण यादव, बांधकाम आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील, महिला बाल कल्याण समिती सभापती पद्माराणी पाटील,  समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासणे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने युवराज (बापू) पाटील, जयंवतराव  शिंपी, राजवर्धन रामराजे नाईक- निंबाळकर, राहुल आवाडे ऑनलाईन व्हिसीव्दारे अरुणराव इंगवले, राहूल पाटील, संध्याराणी बेडगे जि.प.सदस्य, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) मनिषा देसाई तसेच  इतर सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांची निवड करतांना त्यांचे गोपनीय अहवालातील अतिउत्कृष्ट शेरे, समय सुचकता, प्रशासकीय कामकाजाची माहिती, निर्णयशक्ती,  नियमांचे   ज्ञान, सामाजिक शैक्षणिक कलागुण , सचोटी प्रामाणिकपणा इत्यादि निकष विचारात घेवून पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यानुसार  कक्ष अधिकारी /अधिक्षक-1, वरिष्ठ सहायक-1 कनिष्ठ सहायक-1, वाहनचालक -2 (विभागून ) विस्तार अधिकारी (शिक्षण श्रेणी 2-3 ) -1, सहा.लेखाधिकारी/कनिष्ठ लेखाधिकारी- 2 (विभागून ) कृषि विस्तार अधिकारी-1  शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता -1, पशुधन पर्यवेक्षक -1, आरोग्य सेवक (पु) -1,आरेाग्य सहायक (पु) -1 आरोग्य सेविका  -1, आरोग्य सहायक (महिला) -1 औषध निर्माण अधिकारी  01 अशी एकुण 16 कर्मचा-यांची पुरस्कारासाठी निवड करण्या आली आहे.

जिल्हा परिषदेकडून जिल्हयातील विकास कामांच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य जि.प. कर्मचारी यांचाही सहभाग मोठा असतो. जि.प. पं.स.सदस्य  कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा पुढील काम करण्या प्रोत्साहन मिळावे याकरिता त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेने सन 2020-21 चे जि.प.सदस्य यांना यापुर्वी राजर्षी शाहु पुरस्काराने गौरवण्या आलेले आहे. तसेच सन  2020-21 चे आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार यापुर्वी जाहीर करण्या आले आहेत.

राजर्षि छत्रपती शाहू पुरस्कार -2020 निवड यादी

अ. क्र.

कर्मचारी नांव

पदनाम

विभाग/कार्यालयाचे नांव

1

श्रीम सुमन शिवाजी सुभेदार

वि.अ. शिक्षण         श्रेणी 2/3

गट शिक्षण विभाग. पंचायत समिती चंदगड

 

2

श्री नारायण बबन चांदेकर

अधीक्षक

सामान्य प्रशासन विभाग जि.प.कोल्हापूर

3

श्री प्रशांत पांडुरंग पाटील

व. सहायक

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा. जि.प. कोल्हापूर

4

श्री नंदकुमार मारुती पार्टे

कनिष्ठ सहायक

शिक्षण विभाग पं.स.राधानगरी

5

श्री आनंदा पाडुरंग चव्हाण

वाहन चालक (विभागून)

सामान्य प्रशासन विभाग जि.प.कोल्हापूर

6

श्री सुभाष गणपतराव लांबोरे

ग्रामपंचायत विभाग जि.प.कोल्हापूर

7

श्री संभाजी रामचंद्र हंकारे

सहा.लेखाधिकारी व कनिष्ठ लेखाअधिकारी (विभागून)

अर्थ विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर

8

श्री शांताराम शामराव पाटील

आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर

9

श्री संतोष आनंदराव पाटील

सहाय्यक अभियंता       श्रेणी-2

उप विभाग (बांधकाम) पं.स.राधानगरी

10

श्री शिवाजी रामचंद्र कोळी

विस्तार अधिकारी (कृषि)

पंचायत समिती शिरोळ

11

श्री विनायक मारुती पाटील

पशुधन पर्यवेक्षक

पंचायत समिती गडहिंग्लज

12

श्री प्रविण प्रकाश मुळीक

आरोग्य सेवक (पु)

उप केंद्र निगवे प्रा.आ.केंद्र,इस्पुर्ली, ता.करवीर

13

श्री अमोल विठ्ठल कोळी

आरोग्य सहायक (पु)

प्रा.आ.केंद्र, टाकळी, ता. शिरोळ

14

श्रीम अनघा दिलीप पाटील

आरोग्य सेवक (महिला)

उप केंद्र पाडळी बु. प्रा.आ.केंद्र, भुये ता.करवीर

15

श्रीम बेबीताई वसंत घोलप

आरोग्य सहायक (महिला)

प्रा.आ.केंद्र, करंजफेण ता.शाहुवाडी

16

श्री रामचंद्र श्रीपती गिरी

औषध निर्माण अधिकारी

प्रा.आ.केंद्र, मिणचे खु. ता.भुदरगड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.