मंगळवार, ८ जून, २०२१

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी समाज कल्याण कार्यालयामार्फत विविध योजना

 


 

कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग,विशेष मागास प्रवर्ग,इतर मागास प्रवर्ग व दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी समाज कल्याण कार्यालयामार्फत सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात.

जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींची संख्यात्मक माहिती गोळा करण्यात येत असून माहिती गोळा करताना संबंधीत गावामधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर मागासवर्ग या सर्व प्रवर्गातील एकूण कुटूंबांची, नागरिकांची, दिव्यांगांची तसेच ज्येष्ठ नागरिकांची संख्या त्याचबरोबर एकूण प्रवर्गामधील स्त्री, पुरूष तसेच तृतीयपंथी आदी प्रवर्गांचा यात समावेश करण्यात आलेला आहे.

सांख्यिकी माहिती जमा झाल्यानंतर त्यांची तालुकानिहाय जिल्हयाची एकत्रित माहिती करून समाजामधील सर्व वंचित घटकांना या विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे. 

 

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.