मंगळवार, ८ जून, २०२१

कौशल्य व उद्योजकता विकास अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना आवाहन

 


कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे कर्नाटक सीमाभागात असलेल्या चंदगड तालुक्यातील मौजे शिनोळी येथे स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येकी 3 महिन्याकरीता कौशल्य उद्योजकता विकास अभ्यासक्रम (प्रमाणपत्र अभ्यासक्रम) सुरु करण्यात येणार आहे.

यामध्ये काजू आली, बटाटा, रताळी प्रक्रिया उद्योग व विक्री, ड्रेस-डिझायनिंग, टॅली तसेच ट्रॅव्हल्स ॲण्ड टुरिझम आदी कोर्सेससाठी प्रवेश देणे सुरु असून, टॅली अभ्यासक्रमासाठी 10 वी तर टुरिझमसाठी 12 वी पास पात्रता आवश्यक असून उर्वरित अभ्यासक्रमासाठी 7 वी पास असणे आवश्यक आहे. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 20 जणांच्या तुकडीला प्रवेश देण्यात येईल.

हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विद्यापीठाने जागा भाड्याने घेतली असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात  येणार आहे. येत्या जुलै अखेरपर्यंत ही प्रक्रिया सुरु होईल. अधिक माहितीसाठी 9850012545 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन या अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. ए. एम. गुरव यांनी केले.  

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.