कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील फक्त जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत मजूर सह. संस्था/ सुशिक्षीत
बेरोजगार (स्थापत्य) अभियंते/ सर्वसाधारण कंत्राटदार यांच्यासाठी कामवाटप समितीची
बैठक सोमवार दि. 28 जून रोजी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, व कागलसाठी मजूर
संस्थेची सकाळी 11.30 वा, सर्वसाधारण दुपारी 12 वा., सुबेअ दु. 1 वा व विद्युत
सुबेअ दु. 2 वा जिल्हा परिषद, जुने सभागृह
(कागलकर हाऊस) येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कामवाटप समितीचे सदस्य
सचिव यांनी दिली.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत
सुशिक्षीत बेरोजगार (स्थापत्य) अभियंते, मजूर सहकारी संस्था व सर्वसाधारण
कंत्राटदार यांनी मिटींगला येताना ज्यांच्या नावे सुबेअ/ मजूर/ सर्वसाधारण
वर्गातले जिल्हा परिषदेचे रजिस्ट्रेशन आहे त्यांनी स्वत: आपल्या पासबुकसह व मजूर
संस्थांचे चेअरमन / सचिव यांनी आपल्या पासबुकसह हजर रहावे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.