कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : बाल व किशोरवयीन
कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर
ठेवणे तसेच 14 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन
मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियांमध्ये कामावर
ठेवणे हा गुन्हा आहे. मालकाने/ नियोक्त्याने बालक अथवा किशोरवयीन मुलास कामावर
ठेवल्यास त्यांना 20 हजार ते 50 हजार रूपयांपर्यंत दंड वा 6
महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते.
12 जून आंतरराष्ट्रीय बाल
कामगार विरोधी दिन आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये कोणत्याही आस्थापनेमध्ये 14
वर्षाखालील बालकास अथवा धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये 18 वर्षाखालील किशोरवयीन
बालकांस कामावर ठेवल्याचे निदर्शनास आल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय,
शाहुपूरी, व्यापारी पेठ, कोल्हापूर यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्ह्यातील सर्व
आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य व्यावसायिकांना सहाय्यक कामगार आयुक्त संदेश
आयरे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.