मंगळवार, ८ जून, २०२१

पंधरा वर्षानंतर करता येणार जन्म नोंदीमध्ये नाव नोंदणी

 


 

कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : नागरीकांच्या जन्माच्या नोंदणीला पंधरा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला परंतु नाव नोंदविले नाही अशा सर्व नागरिकांनी दिनांक 27 एप्रिल 2026 पर्यंत नाव नोंदणी करुन घ्यावी. यापूर्वी ही मुदत दि. 14 मे 2020 पर्यंत होती. तथापि ही मुदत आणखीन पाच वर्षानी वाढविण्यात आली असल्याने नागरिकांना 27 एप्रिल 2026 पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

जन्म दाखल्यात नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र (दहावी, बारावी), पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड यापैकी दोन पुराव्यास‍ह दिनांक 26 एप्रिल 2026 पर्यंत जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयात अर्ज करता येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ. यु. जी. कुंभार यांनी दिली. 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.