कोल्हापूर,
दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): शेतकऱ्यांच्या
आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आशियायी विकास बँकेच्या
आर्थिक सहकार्याने 'महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क' (मॅग्नेट)प्रकल्प राबविण्यात
येत आहे. कोल्हापूर विभागातील केळी, डाळिंब, स्ट्राबेरी, भेंडी व मिरची आणि फुलपिके
या पिकांचा समावेश मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात
२५ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ५ मूल्य साखळी गुंतवणूकदारांची निवड केली जाणार
आहे.
या प्रकल्पाचा कालावधी ६ वर्षांचा असून २०२६-२७ पर्यंत राबविण्यात
येणार आहे. हा प्रकल्प १४२.९ दश लक्ष अमेरिकन डॉलर्स इतक्या रकमेचा असून, त्यापैकी
७० टक्के निधी आशियायी विकास बँकेकडून
कर्ज स्वरूपात तर ३० टक्के निधी राज्य
शासनाचा स्वनिधी यामध्ये असणार आहे.
राज्यातील डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ,पेरू, चिकू,
स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची (हिरवी व लाल)व फुलपिके इ. फलोत्पादन पिकांसाठी उत्पादन
ते ग्राहकअशी एकात्मिक मूल्य साखळ्यांचा विकासासाठी या प्रकल्पाची आखणी केली आहे.
यात सध्या अस्तित्वात असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या शेतकरी उत्पादकसंस्था,
निर्यातदार, प्रक्रियादार, संघटित किरकोळ विक्रेते, कृषी व्यवसाय करणारे लघू व
मध्यम उद्योजक,वित्तीय संस्था, स्वयंसहाय्यता समुह आदींचा सहभाग घेण्यात येईल.
मॅग्नेट' प्रकल्पामुळे फळे ,भाजी व फुलपिके इत्यादी च्या मूल्य साखळ्यांमध्ये
खाजगी गुंतवणूक आकर्षित करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे .
या पिकांच्या काढणी पश्च्यात नुकसान कमी होण्यास व त्यांची साठवणूक क्षमता वाढवण्यास
मदत होणार आहे . या प्रकल्पामुळे शेतकरी उत्पादक संस्थांचा मूल्य साखळीतील सहभाग वाढणार
आहे .
याबाबत अर्ज स्विकारण्याची अंतिम
मुदत २८ जूनपर्यंत असणार आहे. यासाठीच्या अर्जाचा नमुना www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून संबंधितांनी अर्ज ऑनलाइन नोंद
करून, प्रत्यक्ष स्वरूपात परिपूर्ण प्रस्ताव विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य कृषी
पणन मंडळ, कोल्हापूर येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे .
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.