सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय कार्यालयातील जुन्या साहित्याची निविदेव्दारे विक्री

 


 

 कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय) : उपसंचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयातील जुनी निरूपयोगी लोखंडी व लाकडी कपाटे, रॅक, टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर, प्रिंटर, कुलर, टायर इ. साहित्याची निविदेव्दारे विक्री करावयाची आहे, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रशांत कोरे यांनी दिली.

साहित्याची एकूण किंमत, निविदा अर्ज, निविदेतील अटी व शर्तींची माहिती उपसंचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय कार्यालयात दि. 2 ऑगस्टपासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 2 या वेळेत उपलब्ध राहील. साहित्याची प्रत्यक्ष पाहणी या कालावधीमध्ये करता येईल.

निविदा प्रक्रीयेचा तपशील खालीलप्रमाणे-

अ)               निविदा अर्जाची विक्री- प्रथम निविदा- दि. 2 ते 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 1. व्दितीय निविदा दि. 9 ते 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 1. तृतीय निविदा- दि. 17 ते 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 1

ब) सिलबंद निविदा सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ- प्रथम निविदा- दि. 6 ऑगस्ट रोजी दु. 1 पर्यंत. व्दितीय निविदा- दि. 13 ऑगस्ट रोजी दु. 1 पर्यंत तृतीय निविदा- दि. 23 ऑगस्ट रोजी दु. 1 पर्यंत

क)               निविदा उघडण्याची तारीख व वेळ- प्रथम निविदा- दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वा.व्दितीय निविदा- दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वा. तृतीय निविदा -दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वा.

            प्रथम निविदा प्रक्रियेत किमान 3 निविदा प्राप्त होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास अथवा अपसेट प्राईसपेक्षा कमी किंमत आल्यास व्दितीय/ तृतीय निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.