कोल्हापूर,
दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय
मुलांचे शासकीय वसतिगृह योजना राबविली जाते. चंदगड तालुक्याच्या ठिकाणी मागासवर्गीय
मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर असून सद्या भाडोत्री इमारतीमध्ये सुरु आहे.
वसतिगृहाच्या शासकीय इमारतीचे
बांधकाम करावयाचे असून या इमारतीसाठी किमान 1.5 किंवा 2 एकर जमीन शासकीय दरानुसार चंदगड शहरामध्ये किंवा
शहराच्या जवळपास आवश्यक आहे. जमिनीसाठी रस्ता असणे आवश्यक असून वीज व पाण्याची सोय
असल्यास प्राधान्य दिले जाईल. याकरिता इच्छुक असलेल्या जमीन मालकांनी 7/12 फ्रेश (बिगर
शेती) उताऱ्यासह गृहपाल मानसिंग जगताप, मुलांचे शासकीय वसतिगृह, चंदगड, भ्रमणध्वनी
क्र. 8308379099 किंवा सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर दूरध्वनी क्र. 0231-2651318
या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल
लोंढे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.