कोल्हापूर, दि. 1
(जिमाका) : सहायक
आयुक्त, समाजकल्याण व समाजकार्य महाविद्यालय सायबर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने
सोमवार दि.4
ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये सायबर महाविद्यालय, कोल्हापूर येथे तृतीयपंथीयांसाठी
एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेमध्ये तृतीयपंथीयासाठी काम करत असणारे राज्य व राष्ट्रीय
स्तरावरील सन्माननीय उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपस्थित सर्व तृतीयपंथीयांना ओळखपत्र
व प्रमाणपत्र सहजरित्या प्राप्त होण्यासाठी त्यांची
माहिती राष्ट्रीय
पोर्टलवर विनामुल्य भरण्यात येणार आहे,
जेणेकरून जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीय नागरिकांना तृतीयपंथी असल्याबाबत प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणे सोयीचे होणार आहे.
या शिबिरामध्ये जिल्ह्यातील
सर्व तृतीयपंथी सदस्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपला सहभाग नोंदवावा, असे अवाहन जिल्हा तृतीयपंथी तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.