कोल्हापूर, दि. 2 जिमाका): जिल्ह्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये,
अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, समुह विद्यापीठे, तंत्रनिकेतन व तत्सम
शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग दिनांक 3 फेब्रुवारी पासून सुरु करण्यास अटी व शर्तीस अधीन राहून जिल्हाधिकारी
तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी परवानगी दिली
आहे.
दि. 25 जानेवारी रोजीच्या परिपत्रकातील सर्व अटी-शर्तींचे
पालन करणे बंधनकारक राहिल. परंतु दर 48 तासांनी RTPCR तपासणी न करता ज्यांचे दोन्ही
लसीकरण पूर्ण झाले आहेत व कोरोनाची लक्षणे नाहीत अशाच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयामध्ये
उपस्थित रहावे. कारोनाची लक्षणे असणाऱ्या प्रत्येक शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्याने
स्वत:ची RTPCR चाचणी आवर्जून करावी.
ज्या गावांमध्ये / शहरांमध्ये (कोल्हापूर शहर वगळून)
2011 च्या जनगणनेनुसार 1 टक्का लोकसंख्या किंवा 100 यापैकी जे कमी असेल एवढे कोरोना
रुग्ण असतील तेथील महाविद्यालयांच्या महाविद्यालय व्यवस्थापन समित्यांनी / पालक शिक्षक
समित्यांनी तात्काळ बैठक घेवून खालील पैकी एक पर्याय निवडूनच महाविद्यालये चालवावी.
प्रत्येक वर्गात 50 टक्के विद्यार्थी एक दिवस आड बोलावणे
आणि प्रत्येक शैक्षणिक घटक या दोन्ही गटांना शिकविणे.
विद्यार्थ्यांना दोन वर्गांमध्ये समसमान विभागून बसविणे
आणि उपलब्ध सर्व शिक्षकांचा एकत्रित वापर करुन अद्यापन करणे. यासाठी एका सत्रात एरवी
भरणारी महाविद्यालये वर्ग खोल्यांच्या उपलब्धतेप्रमाणे दोन सत्रात बोलवावी लागू शकेल
व शिक्षकांच्या दैनंदिन तासिका वाढू शकतील.
महाविद्यालये ऑनलाईन सुरु ठेवणे किंवा किमान 50 टक्के विद्यार्थी
ऑनलाईन असतील याची खात्री करुन महाविद्यालये ऑनलाईन तसेच ऑफलाईन सुरु ठेवणे.
गावांमध्ये / शहरांमध्ये कंटेनमेंट झोन मधील महाविद्यालये
बंद राहतील व कंटेनमेंट झोन मधील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देवू नये. तसेच
कोरोनाची लक्षणे असणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी यांना महाविद्यालयात प्रवेश
देवू नये.
कोरोना बाधीत / कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींच्या
घरातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येवू नये तसेच अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात
प्रवेश देवू नये.
विद्यार्थी, प्राध्यापक
व इतर कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण सत्र दि. 10 फेब्रुवारी पर्यंत महाविद्यालयात आयोजित
करावे आणि विद्यार्थ्यांना लसीकरण करुन घेण्यास प्रात्साहित करावे.
तालुका आरोग्य अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांनी रोज संध्याकाळी
कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेवून या आदेशाप्रमाणे त्यांच्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील
महाविद्यालयामध्ये मुद्दा क्र. 2 च्या अनुपालनासाठी योग्य आदेश निर्गमित करावेत आणि
त्यांच्या अंमलबजावणीची खात्री करावी. ज्या गाव / शहरांमध्ये कोरोना प्रादुर्भाव गंभीर
होत आहे, तेथील शाळा / कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी स्वतंत्र आदेश निर्ममित करण्यात
येतील.
वरील आदेशाचे पालन
न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम
2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील
तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई
करण्यात येईल.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.