इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २५ जुलै, २०२०

कोविड रुग्णालयांच्या प्रभावी कामकाजासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण व समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती - जिल्हाधिकारी दौलत देसाई


     

 

       कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्हयातील कोरोना विषाणू संबंधीत रुग्णालयातील कामकाजात अधिकाधिक सुसुत्रता आणणे रुग्णालयांचे कामकाज अधिक प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हा जिल्हास्तरावर नियंत्रण व समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी‍ दिले.

          जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या नियंत्रणाखाली छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयासाठी समन्वय अधिकारी म्हणून भारत राखीव बटालीयन- 3 चे समादेशक जयंत मिना,  डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज ॲण्ड हॉस्पीटल कदमवाडीसाठी समन्वयक अधिकारी म्हणून उपवन संरक्षक हणमंत धुमाळ आणि इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजीसाठी सह्रयाद्री व्याघ्र राखीव चे वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक सत्यजीत गुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियंत्रण अधिकारी व समन्वय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या

 

१)     रुग्णालयातील अतिदक्षता विभाग कोरोना वॉर्ड रुग्णांसाठी खाटा उपलब्धतेचे योग्य व्यवस्थापन करणे.

२)     रुग्णालयातील सर्व ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी,  प्राध्यापक, सहयोगी  प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पॅरामेडीकल स्टाफच्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय अधिक्षक रुग्णालय यांच्याशी समन्वयाने पूर्ण वेळ नेमणूका करणे.

३)     प्रत्येक अतिदक्षता विभागात ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ, विभाग प्रमुख प्राध्यापक पूर्णवेळ रुग्णांच्या तपासणीसाठी उपलब्ध असतील असे नियोजन करणे त्यावर नियंत्रण ठेवणे.

४)   रुग्णालयातील अतिदक्षता विभागाव्यतिरिक्त इतर विभागात / वॉर्डमध्ये कोरोनरुग्णांना जास्तीत जास्त खाटा उपलब्ध होतील या प्रमाणे नियोजन करणे त्याची अमंलबजावणी करणे.

५)    रुग्णालयात क्रिटीकल रुग्णासाठी टॉक्सीलीझुमॅप, रेमेडेसिवीर इत्यादी औषधे त्याच प्रमाणे आवश्यक सर्वसाधारण इतर औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील याचे नियोजन करणे.

६)     रुग्णालयातील सुरक्षेसाठी नियुक्त यंत्रणा, रुग्णांना जेवण पुरवणारी यंत्रणा, स्वच्छता निरजंतुकीकरण यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, मदत कक्ष इत्यादी व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे. तसेच योग्य प्रमाणात कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे.

७)    प्रत्येक वॉर्डमध्ये स्वच्छता, निरजंतुकीकरण याचे व्यवस्थापण करणे. रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सर्व सोईसुविधा, नोंदणी, डिस्चार्ज या गोष्टीवरती पूर्ण नियंत्रण ठेवणे.

८)    अतिदक्षता तसेच इतर विभागात आस्थापित केलेली CCTV यंत्रणा योग्य रितीने सुरु असलेबाबतची तपासणी करणे.

९)     कोविड 19 या संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी नेमून दिलेल्या रुग्णालयांच्या आवश्यकतेप्रमाणे बैठक घेवून व भेटी देवून विविध उपाययोजना सुचविणे.

१०) कोविड 19 गंभीर व अतिगंभीर रुग्ण यांची दैनंदिन तपासणी (सकाळ, दुपार व संध्याकाळ) नेमून दिलेल्या स्टाफ करतो का याची खातरजमा करणे व त्यांच्या नोंदी तपासणे.

११) जबाबदारी देण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये  दैनंदिन येणाऱ्या रुग्णांच्या नोंदी अद्यायावत ठेवणेत येतात का हे पाहणे.

रुग्णांचे तपासणी नमुने घेतल्यानंतर तपासणी अहवालाचा कालावधी 24 तासापेक्षा कमी राहील यासाठी नियंत्रण ठेवणे.

१२) संबंधित रुग्णालयांकडून प्रयोगशाळांकडे रुग्णांचे घेण्यात आलेले नमूने वेळेवर अचूक पोहोचतील याबाबत व्यवस्था करण्यात आली आहे का याची खातरजमा करणे.

१३) रुग्णांचे नमूने घेताना विहीत नमुन्यातील फॉर्ममध्ये रुग्णांचे नाव, पत्ता तसेच संपर्क क्रमांक अचूकपणे भरण्यात येत आहेत याची खातरजमा करणे.

14)जनतेसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात येवून सदर हेल्पलाईन क्र. 24 तास सुरु राहील याची खातरजमा करणे.

15)कोविड 19 रुग्णांमध्ये मृत्यूदर कमी ठेवणे व रुग्णांची योग्य व्यवस्थापन करणेकामी वेळोवेळी रुग्णालयांची पाहणी करणे, ‍ कोविड वॉर्डाला भेट देणे त्यांच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे, रुग्ण व्यवस्थापनेमध्ये हलगर्जीपणा होत आहे असे निर्दशनास आल्यास संबंधीताच्या विरुध्द कारवाई प्रस्तावित करावी.

16) शासनस्तरावरुन यापूर्वीसंबंधीत रुग्णालयांसाठी ज्या ज्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्या सुचनांचे पालन रुग्णालयांमार्फत होत आहे अगर कसे याची खातरजमा करणे.

नियंत्रण व समन्वय अधिकाऱ्यांना संबंधीत रुग्णालयांचे अधिष्ठाता, अधीक्षक व सर्व संबंधीतांनी पूर्ण सहकार्य करावे. महानगरपालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त व इचलकरंजी येथील इंदीरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी यांनी या पथकातील अधिकाऱ्यांशी  समन्वय ठेवून रुग्णालय व्यवस्थापनात सहकार्य करावे. आदेशाचे उल्लंघन करणारे अधिकारी यांनी कामात कसुर केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ‍2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हीड उपाय योजना 2020 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आदेशात नमूद केले आहे.

0 0 0 0  0 0 0

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.