इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

जैव वैद्यकिय कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे बंधनकारकर - मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण

 



      कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): ग्रामीण भागात जैव वैद्यक व्यवस्थापनाबाबत कोणतीही कायमस्वरूपी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नसून कचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत सद्या अस्तित्वात असलेली व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात ठेवावी. श्री गोविंद चोकल प्रा.लि. कुडाळ, सिंधुदुर्ग यांची डिस्पोजल यंत्रणा अन्य जिल्ह्यात असल्याने सनियंत्रण करणे शक्य नसल्याने त्यांच्याकडील आजरा, चंदगड तालुक्यातील जैव वैद्यकीय कचरा श्री. एसएससव्हिसेस, इचलकरंजी यांच्याकडे शाहूवाडी व पन्हाळा  तालुक्यातील जैव वैद्यकीय कचरा श्री एस. एस. सर्व्हीसेस या दोन संस्थेकडे जैविक कचरा विल्हेवाट करावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चवहण यांनी दिले.

            जैव वैद्यकिय कचरा व्यवस्थापनाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.  यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, डॉ. योगेश साळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने आदी उपस्थित होते. 

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, वेगवेगळया ठिकाणी तयार होणारा जैव वैद्यकीय कचऱ्याचे संकलन, वाहतुक व विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे नियोजित आहे.  सर्व दवाखाने, प्रयोग शाळा, रक्तपेढ्या व इतर संस्थांनी नोंदणी केली नसल्यास 15 दिवसांच्या आत नियुक्त केलेल्या संस्थेकडे नोंदणी करावी. जैव वैद्यकीय कचरा वाहतुक करणाऱ्या प्रत्येक वाहनावर जी.पी.एस. प्रणाली सक्तीची करण्यात येत आहे.  पिशवीचा रंग, पिशवीचा प्रकार व कचऱ्याचा प्रकार या नुसार वर्गीकरण करण्यात येत असून, जैव वैद्यकीय कचऱ्याचे दररोजचे सरासरी प्रमाणानुसार पिशवीला बारकोड लाववेत. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय व्यवसायिकांनी नोंदणी करुन जैव वैद्यकीय कचरा विशिष्ट रंगाप्रमाणे वर्गीकरण करुन द्यावा न दिल्यास सबंधितांवर रितसर कारवाई करण्यात येईल.

जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाकरीता नोंदणी व मासिंक फी जादा आकारण्यात येत आहे तरी फी कमी करण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सबंधित संस्थांकडे मागणी केली.

"माझी वसुंधरा" प्रकल्पातंर्गत सर्व शासकीय संस्थामध्ये "झिरो वेस्ट ऑफिस" संकल्पना राबविण्यात यावी.

            जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन योग्य व्हावे यासाठी आदर्श मार्गदर्शक व्यवस्थापन प्रणाली तयार केली जाईल व त्याची अंमलबजावणी केली जाईल याबाबत किमान दोन महिन्यातून एकदा आढावा बैठक आयोजित करण्याबाबत चर्चा झाली.  आभार जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या  जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.शुभांगी रेंदाळकर यांनी मानले.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.