https://www.youtube.com/post/Ugkx9jslyeGPLfKGDPk_mEjw37qLuY5PM9w3
Thursday, August 15, 2024
Friday, May 10, 2024
प्राणीगणनेसाठी 15 मे पर्यंत अर्ज करा - एस.एस.पवार
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): सालाबादप्रमाणे यावर्षीही
कोल्हापूर वन्यजीव विभागाअंतर्गत दि. 22 व 23 मे 2024 रोजी बुध्द पौर्णिमेदिवशी प्राणी गणना करण्यात येणार
आहे. ही प्राणी गणना राधानगरी अभयारण्य व सागरेश्वर अभयारण्य येथील जंगलातील विविध
ठिकाणी होणार आहे. प्राणीगणनेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांनी कोल्हापूर वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्राणीगणनेकरीता उपलब्ध अर्ज डाऊनलोड करुन भरुन या
कार्यालयाच्या census2023wlkop@gmail.com या इमेल वर दि. 10
ते 15 मे 2024 अखेर आवश्यक कागदपत्रांसह PDF स्वरुपात पाठवावा. आपले अर्ज वरील कालावधीत
असले पाहिजेत. ईमेल सोडून इतर कोणत्याही स्वरुपात अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच
मचान मर्यादित असल्याने प्रथम ईमेल येणा-या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल,
असे आवाहन विभागीय वन अधिकारी (वन्यजीव)
एस.एस.पवार यांनी केले आहे.
कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी
मे महिन्यामध्ये बुध्द पौणिमेदिवशी रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशामध्ये राधानगरी अभयारण्य
(कोल्हापूर जिल्हा) व सागरेश्वर अभयारण्य (सांगली जिल्हा) मध्ये प्राणीगणनेचा कार्यक्रम
केला जातो. या प्राणी गणनेमध्ये निसर्गप्रेमींना एक दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्यांचे
दर्शन, आवाज, वनसंपदा व जैवविविधतेचा अनुभव मिळतो. दरवर्षी प्राणीगणनेस उदंड प्रतिसाद
मिळत असतो. यातून जनसामान्यांना वन्यप्राणी व जंगलामध्ये वनविभागामार्फत करण्यात येत
असलेली कामे, वनसंपदा टिकविण्यासाठी वनविभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न याची
जवळून माहिती होते. त्यांच्यासाठी या एका दिवसाचा अनुभव कायम स्मरणात राहणारा असतो.
अर्ज भरण्याबाबत शंका असल्यास विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) कोल्हापूर यांचे कार्यालय, विचारेमाळ, सदर बाजार, कोल्हापूर 416003, ई मेल www.mahaforest.gov.in व census2023wikop@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0231-2669730 वर संपर्क साधावा, असेही श्री. पवार यांनी कळविले आहे