कोल्हापूर दि. 5: राज्य शासनामार्फत सन 2009-10 व 2010-2011 या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार व जिजामाता राज्य
क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यासाठी मान्यता प्राप्त खेळांच्या
अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील
कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, कार्यकर्ते किंवा संघटक तसेच क्रीडा मार्गदर्शकांचे विहित
नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेचा ठराव व शिफारशीसह दि. 31 मे 2012
पर्यत क्रीडा व युवक
सेवा संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे या पत्यावर मागविण्यात येत आहेत. खेळाडू किंवा
मार्गदर्शकांस विहित नमुन्यातील अर्ज वैयक्तिकरित्याही परस्पर संचालनालयाकडे सादर
करता येतील. क्रीडा संघटक किंवा कार्यकर्ते यांनी विहित नमुन्यातील अर्ज विभागीय
उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर
यांच्या कार्यालयकडे विहित मुदतीत सादर करावेत.वरील सर्व क्रीडा पुरस्काराबाबत
अधिक माहिती व नमुना अर्ज क्रीडा विभागाच्या ... या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आली आहे तसेच अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्तांनी प्रसिध्दी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.