कोल्हापूर, दि.
7 (जिमाका) : दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे
मराठा कुणबी नोंदी पडताळणी व त्याचे संगणकीकरण करण्यासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात
आला असून जिल्ह्यातील सर्व सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक
पत्नी विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी व सेवारत सैनिकांना कळविण्यात येते की, माजी
सैनिकांच्या मराठा कुणबी नोंदीची पडताळणी करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
कर्नल (निवृत्त) राहुल माने यांनी केले आहे.
ज्या माजी सैनिकांच्या कागदपत्रात कुणबी, कुणबी मराठा,
मराठा कुणबी अशी नोंद असलेल्या त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर किंवा
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील स्पेशल सेलशी कागदपत्रे घेवून संपर्क साधावा
असे ही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) श्री. माने यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.