कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या कर्तव्यावर असताना
अपघातात मयत झालेल्या ग्रामसेवक संदिप तेली यांच्या पत्नी श्रीमती मेघा तेली यांना
महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज 15 लाख
रुपयांचा धनादेश देण्यात आला.
शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील ग्रामसेवक संदिप
सातलिंगा तेली हे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या कामकाजासाठी वडणगे व पाडळी बु.
येथे कार्यरत होते. 18 एप्रिल 2019 रोजी रात्री 11.15 वाजता मोटरसायकलवरुन कोल्हापूरकडे
येत असताना शिवाजी पुलावर त्यांचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला
होता.
सानुग्रह अनुदान म्हणून 15 लाख रुपयांचा
धनादेश त्यांची वारस श्रीमती मेघा संदिप तेली यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या
हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ
कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, ग्रामपंचायत विभागाचे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव आदी उपस्थित होते.
00000

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.