इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

आजअखेर 2736 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील


       कोल्हापूर,दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 307 प्राप्त अहवालापैकी 276 निगेटिव्ह तर 28 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (3 अहवाल नाकारण्यात आला आहे.)  अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 46 प्राप्त अहवालापैकी 39 निगेटिव्ह आहेत, तर 7 पॉझीटिव्ह असे एकूण 35 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 6180 पॉझीटिव्हपैकी 2736 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 3263 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

          आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त 35 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा- 5, भुदरगड- 1, चंदगड- 1, कागल-1, करवीर-1,  नगरपालिका क्षेत्र- 2, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 24 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 132, भुदरगड- 137, चंदगड- 379, गडहिंग्लज- 244, गगनबावडा- 13, हातकणंगले- 507, कागल- 107, करवीर- 663, पन्हाळा- 258, राधानगरी- 207, शाहूवाडी- 268, शिरोळ- 236, नगरपरिषद क्षेत्र- 1327, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-1625 असे एकूण 6103 आणि इतर जिल्हा व राज्यातील 77 असे मिळून एकूण 6180 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 6180 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 2736 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 181 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 3263 इतकी आहे.

000000

 


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करा


                                                 

कोल्हापूर,दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी व 12 वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी उत्तीर्ण इ. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्य  सरासरी 60 पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पां. भ. गिऱ्हे यांनी केले आहे.

 सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इ. 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमासाठी विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) सामाजिक न्याय भवन येथे 416602 अथवा lasde.kolhapur.@gmail.com येथे आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी.

आवश्यक कागदपत्रे याप्रमाणे- उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना साध्या कागदावर फोटो लावून अर्ज (भ्रमणध्वनी नमुद करावा), जातीचा दाखल, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड (शिधापत्रिका) छायांकीत प्रत, आधारकार्ड, गुणपत्रक व पुढील वर्गात प्रवेशाबाबतचा पुरावा.

मातंग समाज व तत्सम 12 पोटजातील विद्यार्थ्यांनी अर्ज व कागदपत्रांच्या छायांकीत प्रती स्वयं साक्षांकित करुन दिनांक 10 ऑगस्ट 2020 पर्यंत कार्यालयीन पाठवावेत.

0000


दहावी व बारावीनंतर पुढे काय ! बुधवारी ऑनलाईन मार्गदर्शन - सहायक आयुक्त ज.बा.करीम


कोल्हापूर,दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉमर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 12.30 वा. .Career After SSC & HSC यावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त ज.बा.करीम यांनी दिली.

            मार्गदर्शन आशुतोष साळी (Young Professional Ministry Of Labour & Employment Model Career Centre Thane.) हे करणार आहेत. मार्गदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी https://bit.ly/33aGTvB या गुगल शिटवर वैयक्तिक माहिती भरुन ऑनलाईन https://meet.google.com/qig-vfoo-nmb या लिंकवर ऑनलाईन सहभागी व्हावे असे, आवाहन सहायक आयुक्त श्री.  करीम यांनी केले आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           

            मार्गदर्शन सत्रास आपण वरील गुगल ॲपच्या लिंकवर जॉईन होवून जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा ही विंनती.

000000


गृह विलगीकरणाच्या वडणगे पॅटर्नला प्रत्यक्षात सुरुवात


 


       कोल्हापूर,दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार करण्याच्या वडणगे पॅटर्नला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. वडणगे ग्रामपंचातीच्या माध्यमातून या रुग्णाला किट देवून मनोबल वाढवून त्याच्याच घरी स्वतंत्रपणे गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. वडणगे ग्रामपंचायतीने पुढाकार घेत अशा पध्दतीने उपचारासाठी मागणी केली होती. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी परिपत्रक पाठवून मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.   

      गावातील एका कॉलनीत राहणाऱ्या या पेशंटला कोरोनाची बाधा झाल्यावर शिंगणापूर येथील कोव्हिड काळजी केंद्रात पाठविले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून या रुग्णाला लक्षणे नसल्याने त्यास गृह विलगीकरणात ठेवता येईल असे सांगितले. या रुग्णाच्या घरी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे, असे पत्र ग्रामपंचायतीने कोव्हिड काळजी केंद्राला दिल्यानंतर रुग्णाला घरी राहण्याची परवानगी देण्यात आली.

            रुग्णाचे मनोबल वाढविण्यासाठी ग्रामपंचायत, दक्षता समिती सदस्य यांनी रुग्णाच्या कॉलनीत जाऊन रुग्णाशी आणि नातेवाईकांशी घराबाहेरून संवाद साधला. घराच्या वरील मजल्यावर स्वतंत्र खोलीमध्ये रुग्ण राहणार आहे. तसेच कुटूंबातील दोन सदस्य खालील खोलीमध्ये रहाणार आहेत.  रुग्णांने कोणती काळजी घ्यावी, सदस्यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत  शासनाने दिलेली नियमावली त्यांना देण्यात आली.  

·         सरपंच सचिन चौगले- शासकीय प्रक्रिया पूर्ण करुन रुग्णाला गृह विलगीकरणात ठेवले आहे. वडणगे गावाने केलेल्या संकल्पाला आजपासून प्रारंभ केला आहे. ग्राम दक्षता समिती त्याचबरोबर ग्रामस्थ यांचे मोठे सहकार्य लाभले. डॉ. अभिजित गाडिवड्ड हे या रुग्णाची काळजी घेणार असून येणाऱ्या काळात हा उपक्रम यशस्वी करु.

·         प्रा. डॉ. महादेव नरके- 25 हजार लोकसंख्या असणाऱ्या वडणगे सारख्या गावात पूर्ण ताकतीने हा संकल्प पुढे जातोय, ही महत्वाची गोष्ट आहे. पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख या सर्वांनी या उपक्रमाला भक्कम पाठबळ दिले आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, दक्षता समितीचे सदस्य, ग्रामस्थ यांनी मोठे पाठबळ दिले आहे.

            सरपंच सचिन चौगले यांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडे ग्रामपंचायतीमार्फत किट दिले. यामध्ये ऑक्सिमीटर, थर्मोमीटर,औषधे, ड्रायफ्रूट , पनीर , आयुर्वेदिक काढा साहित्य, वाफ घेण्यासाठी निलगिरी तेल  याचा समावेश आहे .डॉ.संदिप पाटील यांनी तयार केलेले रुग्णाच्या बाबतीतील दिवसभराचे वेळापत्रक देण्यात आले. यात आहारतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली केलेला डायट प्लॅन, योगा,ध्यान,हलका व्यायाम तसेच वाफ घेण्याचा, आयुर्वेदिक काढा घेण्याच्या वेळा याचा समावेश आहे.

            आवश्यक त्या सर्व सोयी आणि प्रशासनाची योग्य ती मदत व मार्गदर्शन या माध्यमातून डॉ. संदीप पाटील, तसेच गावातील वरिष्ठ डॉक्टर यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक खासगी डॉक्टर डॉ. अभिजित गाडिवड्ड हे या रुग्णाशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधून नोंदी घेणार आहेत.  सोशल कनेक्ट तर्फे प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी काढा करण्याचे साहित्य, ड्रायफ्रूट, नाचणी सत्व रुग्णाला दिले.   सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सतीश पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके, बाजीराव पाटील, रवींद्र पाटील, राजू पोवार, महालिंग लांडगे, अमर  टिटवे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश बागूल यांच्यासह कोरोना दक्षता समिती, ग्रा. पं. सदस्य, वैद्यकीय, प्रशासकीय व ग्रा. पं. कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

0 0 0 0 0 0

 


आजअखेर 2534 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील


       कोल्हापूर,दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज सकाळी 10 वाजेपर्यंत 218 प्राप्त अहवालापैकी 116 निगेटिव्ह तर 50 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (3  जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, 1 अहवाल नाकारण्यात आला आहे तर 48 अहवाल प्रलंबित आहेत.)  जिल्ह्यात आजअखेर एकूण 6145 पॉझीटिव्हपैकी 2534 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 3435 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

          आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 50 पॉझीटिव्ह अहवालापैकी हातकणंगले-2, करवीर-1,  नगरपालिका क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 36 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 127, भुदरगड- 136, चंदगड- 378, गडहिंग्लज- 244, गगनबावडा- 13, हातकणंगले- 507, कागल- 106, करवीर- 662, पन्हाळा- 258, राधानगरी- 207, शाहूवाडी- 268, शिरोळ- 236, नगरपरिषद क्षेत्र- 1325, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-1601 असे एकूण 6068 आणि इतर जिल्हा व राज्यातील 77 असे मिळून एकूण 6145 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 6145 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 2534 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 176 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 3435 इतकी आहे.

000000

 

 


अलमट्टीतून 1922 क्युसेक विसर्ग


 

          कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 156.17 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार अलमट्टी धरणातून 1922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील-  इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 51.79 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 89.401 इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 55.79 दलघमी, वारणा 643.85 दलघमी, दूधगंगा 476.63 दलघमी, कासारी 51.57  दलघमी, कडवी 40.22 दलघमी, कुंभी 52.01 दलघमी, पाटगाव 75.54 दलघमी, चिकोत्रा 22.83 दलघमी, चित्री 28.22 दलघमी, जंगमहट्टी 24.74 दलघमी, घटप्रभा  36.02 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 11.5 फूट, सुर्वे 12.8 फूट, रुई 39.6 फूट, इचलकरंजी 35 फूट, तेरवाड 34 फूट, शिरोळ 26 फूट, नृसिंहवाडी 21 फूट, राजापूर 10.3 फूट तर नजीकच्या सांगली 5 फूट व अंकली 4.7 फूट अशी आहे.

00000

 


कागल तालुक्यात 17.43 मिमी पाऊस


 

कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात कागल तालुक्यात 17.43 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 5 एकूण 212.38 मिमी, शिरोळ- 0.71 एकूण 195 मिमी, पन्हाळा- 0.71 एकूण 602.14 मिमी, शाहूवाडी- 2.67 एकूण 887.17 मिमी, राधानगरी- 0.33 एकूण 882.17 मिमी, गगनबावडा- 9.50 मिमी एकूण 2382.50 मिमी, करवीर- 0.45 एकूण 461.27 मिमी, कागल- 17.43 एकूण 612.57 मिमी, गडहिंग्लज- 4.29 एकूण 449.14  मिमी, भुदरगड- 4.40  एकूण 726.80  मिमी, आजरा- 3  एकूण 992  मिमी, चंदगड- 1.17 मिमी एकूण  912  मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000

 

         


गुरुवार, ३० जुलै, २०२०

‘आम्ही इचलकरंजीकर अधिकारी’ च्यावतीने आयजीएममध्ये गरम पाण्याचे 10 डिस्पेन्सर


 

कोल्हापूर,दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : मूळ इचलकरंजी शहरवासी असलेले आणि राज्यभर कार्यरत असलेल्या अधिकारी वर्गाच्या आम्ही इचलकरंजीकर अधिकारी व्हॉटस् ॲप ग्रुपच्यावतीने आज इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयात गरम पाण्याचे 10 डिस्पेन्सर देण्यात आले. त्यामुळे रुग्णांना पिण्यासाठी गरम पाण्याची सोय झाली आहे.

        ग्रूपचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, शालेय पोषण अधीक्षक प्रवीण फाटक, नगर भू मापन अधिकारी शशिकांत पाटील यांनी या वस्तू आज वैद्यकीय अधिक्षक डॉ. रवींद्र शेटे यांच्याकडे सुपूर्द केल्या.

          दोन वर्षापासून हा ग्रुप काम करीत असून घोरपड़े नाट्यगृह येथे 1000 मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला होता.मागील महापुरातही या ग्रुपच्यावतीने 2 लाख रुपयांच्या विविध वस्तू पूरग्रस्तांना वाटल्या होत्या. चटाई, चादर, जीवनाश्यक वस्तू, महिलांना सॅनेट्री नॅपकीन अशा वस्तूंचा समावेश होता. गावातील युवा होतकरु मुलांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यावसायिक मार्गदर्शन करणे, राज्यभर विविध कार्यात शहरातील लोकांना प्रशासकीय सहकार्य करणे, शहराच्या विविध विकास कार्यात सहकार्य करणे असे काम या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे श्री. रसाळ यांनी सांगितले.

          मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या नेतृत्वात हा ग्रुप कार्यरत आहे. ग्रूपमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, मुख्याधिकारी, पोलिस अधिकारी, अशा विविध पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

00 0 0 0 0


लॉकडाऊनच्या मुदतीत 31 ऑगस्टपर्यंत वाढ 5 ऑगस्टपासून मॉल्स, मार्केट, दुकाने सकाळी 9 ते 7 दुचाकीवर दोघे, तीनचाकीत तिघे, चारचाकीत चौघे जिल्हांतर्गत 50 टक्के प्रवासी क्षमतेसह बससेवा


 

       कोल्हापूर,दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत  31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये मॉल्स, मार्केट, दुकाने 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु राहणार आहेत. जिल्हांतर्गत 50 टक्के प्रवासी क्षमतेसह बससेवा सुरु राहील हेल्मेट व मास्क वापरासह दुचाकीवर दोघांना, तीनचाकीत चालकासह तीन तर चारचाकीत चालकासह चौघांना सूट देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिला.

प्रतिबंधीत / बंद क्षेत्रे खालील प्रमाणे असतील

1.

कोल्हापूर जिल्ह्याच्या सिमा बंदी आदेशाच्या कालावधीत बंद राहतील व या कालावधीत आंतरजिल्हा माल वाहतूक, जीवनावश्यक सेवा / सुविधा व अत्यावश्यक सेवांसाठी होणारी वाहतूक व जिल्हा अंतर्गत सशर्त प्रवासी वाहतुक वगळून उर्वरीत सर्व वाहतूक प्रतिबंधीत असेल.

2.

शाळा, कॉलेज, शैक्षणिक / प्रशिक्षण / शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी प्रतिबंधीत असतील.

3.

एमएचए ने परवानगी दिलेल्या व्यतीरिक्त आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक.

4.

मेट्रो रेल.

5.

रेल्वे व देशांतर्गत होणारी हवाई प्रवासी वाहतूक स्वतंत्र आदेशाद्वारे आणि  एसओपी नुसार परवानगी घेतलेले वगळून.

6.

चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्कस्, प्रेक्षागृहे आणि सभागृहे, असेंब्ली हॉल या सारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधीत असतील.

7.

सर्व सामाजिक / राजकीय / क्रिडा / करमणूक / शैक्षणीक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे प्रतिबंधीत असतील.

8.

धार्मिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणची उपासनास्थळे.

9.

सर्व प्रकारचे बंदीस्त हॉल किंवा खोलीतील खेळ, जिमनॅशियम्स इ.

9.

जीवनावश्यक वस्तू व आरोग्याची कारणे वगळून 65 वर्षावरील व्यक्ती, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती स्त्रीया व दहा वर्षा खालील मुले यांना घराबाहेर पडणे प्रतिबंधीत असेल.

10.

अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तु वगळून सर्व मार्केट व दुकाने सकाळी 09.00 पूर्वी  व सायंकाळी 07.00 नंतर चालू ठेवता येणार नाहीत. एखाद्या ठिकाणी गर्दी होवून सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत असलेचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केट व दुकाने बंद करणेचे आदेश देणेत येतील.

11.

सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखू, सुपारी खाणे व थूकणे प्रतिबंधीत आसेल.

12.

कंटेनमेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही करणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

 

मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई दिनांक 29 जुलै 2020 रोजीच्या आदेशाच्या कलम 8 मध्ये नमूद नसलेल्या सर्व बाबी आणि ज्या प्रतिबंधित किंवा बंदी घातलेल्या नसतील त्या सर्व बाबी प्रतिबंधीत नसलेल्या क्षेत्रामध्ये खालील अटीच्या आधारे सुरू असणेस परवानगी असेल.

1)  यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या सर्व आस्थापना पूर्वी प्रमाणे सुरु राहतील.

2) जिल्हा अंतर्गत बस सेवा हि जास्तीत जास्त 50% प्रवासी क्षमतेसह त्याचबरोबर बसमध्ये शारीरिक अंतर आणि स्वच्छताविषयक उपाययोजनेसह सुरू करता येईल. प्रत्येक बस प्रत्येक वापरानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावी लागेल. त्याच प्रमाणे मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही. वाहनात बसताना सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल

3) मॉल्स आणि मार्केट/दुकाने सकाळी 09.00 वा. ते सायंकाळी 07.00 वा. पर्यंत दिनांक 5 ऑगस्ट 2020 पासून सुरु राहतील. मार्केट मधील चित्रपटगृहे बंद राहतील. फुडकोर्टस व रेस्टॉरंटस यांना फक्त पार्सल सुविधा देता येईल.

4) खुल्या जागेतील सांघिक नसणारे खेळ जसे गोल्फ कोर्स, खुले फायरिंग रेंज, जिम्नॅस्टीकस, टेनिस, खुल्या जागेतील बॅडमिंग्टन आणि मल्लखांब हे खेळ, योग्य ते शारिरीक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळून दिनांक 05 ऑगस्ट 2020 पासून सुरु करता येतील. जलतरण तलाव सुरु करणेस प्रतिबंध असेल.

5) खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह, घर व घराच्या परिसरात विवाह कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 50 नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहण्यास जिल्हाधिकारी यांच्या दि. 23जून 2020 रोजीच्या आदेशात दिले प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

6) केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटीपार्लर्स सुरु करणे संबंधी जिल्हाधिकारी च्यांच्या दि. 26 जून 2020 रोजीच्या आदेशात दिले प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

7) शैक्षणिक संस्था (विद्यापीठे / महाविद्यालये / शाळा) यांचे कार्यालय / कर्मचारी केवळ शिक्षणेत्तर कामकाज करु शकतील व यात ई-सामुग्री विकास, उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन आणि निकाल जाहीर करणे, रिसर्च वर्कर्स व सायंटीस्ट या ही कामांचा समावेश असेल.

8) सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक यांना खालीलप्रमाणे प्रवासी संख्येच्या हमीसह वाहतुक व्यवस्थापन करता येईल. परंतु प्रत्येक वापराचे वेळी असे वाहन निर्जंतुकीकरण करणे, प्रवाशी व चालक/वाहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल. चालकाने त्यांचे वाहनात निर्जंतुकीकरण उपकरण ठेवणे बंधनकारक असेल. त्याच प्रमाणे मास्क न घातलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही.

i.  दुचाकी: 1+1 हेल्मेट व मास्क वापरणे अनिवार्य.

ii.  तीन चाकी: 1+2

iii.  चार चाकी: 1+3

नमुद प्रतिबंधीत बाबी वगळता उर्वरीत सर्व बाबींना मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील  दिनांक 29 जुलै 2020 रोजीच्या आदेशामध्ये नमुद प्रतिबंध व सुट लागू असेल.

        बंदी आदेशातुन सूट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनामध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर इ. बंधने पाळणे आवश्यक आहे.

                                                  पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.

 

कोव्हीड 19 विषाणू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय दिशानिर्देश

1.                   सर्व नागरिकांना सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी मास्क, चेहरा झाकावयाचे साधन वापरणे बंधनकारक असेल.

2.                  सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच वाहतुकीदरम्यान सर्व नागरिकांनी सामाजिक अंतराचा निकष पाळणे बंधनकारक असेल. दुकानामध्ये/ दुकान परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती / गिऱ्हाईक यांना प्रतिबंध असेल तसेच उपस्थित असलेल्या व्यक्ती / गिऱ्हाईकां मध्ये 6 फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारक असेल.

3.                  विवाह कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 50 नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहणेस परवानगी असेल.

4.                 अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त 20 नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहणेस परवानगी असेल.

5.                 राज्य तसेच स्थानिक प्राधिकरणाव्दारे करणेत आलेल्या नियमानूसार तसेच कायद्यामध्ये नमूद असलेल्या तरतूदीनूसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी थुंकणे हे दंडनिय असेल.

6.                  सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास व थूंकण्यास परवानगी असणार नाही.

कामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त दिशानिर्देश

7.                 शक्यतोवर काम हे घरातून करणे विषयीची बाब पाळणेत यावी.

8.                 कार्यालये/ आस्थापनामधील सर्व प्रवेश व बाहेर पडणेच्या ठिकाणी तसेच कार्यालयातील सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिग/ हॅड वॉश/ सॅनिटायझर हे उपलब्ध करून देणे.

9.                  कामाच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक वापराचे ठिकाणे तसेच सर्व गोष्टी ज्या मानवी संपर्कामध्ये उदा. दरवाज्याचे हॅण्डल, इत्यादी तसेच सतत हाताळली जाणाऱ्या बाबींची पुन्हा पुन्हा निर्जंतुकीकरण करणे यावे.

10.               कामाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी कामागारामधील पुरेसे अंतर, कामाच्या वेंळादरम्यान पुरेसे अंतर त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळामध्ये सामाजिक अंतराचा निकष पाळला जावा.

0  0 0 0

 

 

 

 


आजअखेर 2320 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील


       कोल्हापूर,दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज सकाळी 10 वाजेपर्यंत 910 प्राप्त अहवालापैकी 626 निगेटिव्ह तर 217 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (5  जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, 4 अहवाल नाकारण्यात आले आहेत तर 58 अहवाल प्रलंबित आहेत.) अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचा 1 प्राप्त अहवालापैकी 1 पॉझीटिव्ह असे एकूण 218 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 5799 पॉझीटिव्हपैकी 2320 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 3317 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

          आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 218 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड- 2, हातकणंगले-17, करवीर-22, पन्हाळा-3, राधानगरी-6, शाहूवाडी-3,  शिरोळ-5,  नगरपालिका क्षेत्र- 29, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 125 व इतर जिल्हा व राज्य -6 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 122, भुदरगड- 121, चंदगड- 360, गडहिंग्लज- 230, गगनबावडा- 11, हातकणंगले- 471, कागल- 106, करवीर- 637, पन्हाळा- 249, राधानगरी- 207, शाहूवाडी- 268, शिरोळ- 205, नगरपरिषद क्षेत्र- 1236, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-1499 असे एकूण 5722 आणि इतर जिल्हा व राज्यातील 77 असे मिळून एकूण 5799 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 5799 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 2320 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 162 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 3317 इतकी आहे.

000000

 


रक्षाबंधननिमित्त पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था - प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील


कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): रक्षाबंधन निमित्ताने कोल्हापूर डाक विभागाने 2 ऑगस्ट रोजी रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे भाऊ-बहिण कंटेन्टमेंट झोन किंवा सीलबंद इमारतींमध्ये रहात असल्याने एकाच शहरात असूनही अनेकांना आपल्या भावंडांना भेटता येणार नाही. सोमवारए, दिनांक 3 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने त्यांना आपल्या भावाला राखी बांधणेही शक्य होणार नाही. यासाठी पोस्ट विभागाने स्पीडपोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद निर्माण होईल अशा घोषवाक्याने सर्वांना आनंद देण्यासाठी राखी टपालाचे संकलन, प्रसार व वितरण यास प्राधान्य दिले आहे.

00000

 

 


गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश


कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालय व रूग्णालयासाठी कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेसहित आजपासून पुढील आदेशापर्यंत पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात यावे. या रूग्णालयात कोरोना विषाणू संशयित रूग्ण तपासणी व औषधोपचार वगळता इतर सर्व आजारांचे बाह्य रूग्ण, आंतररूग्ण तसेच तातडीच्या रूग्णसेवा बंद राहतील. पंरतु, या रूग्णालयातील बाह्य रूग्णसेवा याच ठिकाणी स्वतंत्र कक्षात पुढील आदेशापर्यंत सुरू ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिले.

जिल्ह्यातील गडहिंग्लज व नजिकच्या परिसरामध्ये कोरोना विषाणू संसर्ग बाधित रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. विशेष करून गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील गावामध्ये रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. तसेच हे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाधित झालेल्या व होऊ शकतील अशा सर्व रूग्णांना एकत्रित विलगीकरण सुविधेमध्ये उपचार देणे अत्यावश्यक असणार आहे.

गडहिंग्लज, आजरा व चंदगड  तालुक्यामधील गावांमध्ये आढळून येणाऱ्या रूग्णांवर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे. कोव्हिड-19 आजाराची लक्षणे असलेल्या रूग्णांच्या उपचारासाठी पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय असणे अत्यंत आवश्यक आहे.

          उपजिल्हा रूग्णालय, गडहिंग्लज व रूग्णालयासाठी कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवेसहित हे रूग्णालय पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात यावे. या रूग्णालयात पुढील आदेश होईपर्यंत कोरोना विषाणू संशयित रूग्ण तपासणी व औषधोपचार वगळता इतर सर्व आजाराचे बाह्य रूग्ण, आंतररूग्ण तसेच तातडीचे वैद्यकीय सेवा बंद राहिल. परंतु, या रूग्णालयामधील बाह्य रूग्णसेवा याच ठिकाणी स्वतंत्र कक्षात पुढील आदेशापर्यंत सुरू ठेवावी. त्याचप्रमाणे इतर रूग्णालये, ग्रामीण रूग्णालय नेसरी/ महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मान्यता प्राप्त खासगी रूग्णालय व BPT Act 1950 अंतर्गत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या धर्मादाय रूग्णालयाकडे स्थलांतरीत करावी व येणाऱ्या सर्व रूग्णांवर संबंधित योजनेतील खासगी/ धर्मादाय रूग्णालयांनी मोफत उपचार करावयाचे आहेत. तसेच श्वानदंश, विंचूदंश, सर्पदंशाकरिता लागणारी सर्व औषधे उपजिल्हा रूग्णालय, गडहिंग्लज यांनी रूग्ण उपचार घेत असलेल्या योजनेतील खासगी/धर्मादाय रूग्णालय यांना उपलब्ध करून द्यायची आहेत.

त्याचबरोबर न्यायवैद्यकीय प्रकरणातील रूग्णांच्या तपासणी व उपचार ग्रामीण रूग्णालय नेसरी येथे करायचे आहे. याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाने नोंद घेवून आवश्यक ती कार्यवाही करावयाची आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रूग्णालय, गडहिंग्लज येथे मृतदेहावरील न्याय वैद्यकीय पोस्ट मार्टम सेवा, औषध विक्री सेवा व इतर लॅब्स नेहमी प्रमाणे सुरू राहतील.

याबाबतचे सर्व नियोजन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संबंधित वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रूग्णालय, गडहिंग्लज यांना नेमून करावयाचे आहे. त्याचबरोबर सद्यस्थितीत उपजिल्हा रूग्णालयातील आंतररूग्ण विभागातील व तातडीचे वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रूग्णांची व्यवस्था उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रशासनाने करावयाची आहे. कोव्हिड रूग्णालयास आवश्यक विशेषज्ञ  व इतर वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्यांचे अधिनस्त इतर रूग्णालयामधून पाळी-पाळीने उपलब्ध करून घ्यावेत. त्याचप्रमाणे खासगीरित्या ही तात्पुरत्या स्वरूपात अशा विशेषज्ञांची व वैद्यकीय अधिकारी यांची सेवा उपलब्ध करून घेण्यात यावी.

त्याचप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी गडहिंग्लज, आजरा व चंदगड परिसरातील खासगी/धर्मादाय रूग्णालय व वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांच्यासमवेत बैठक आयोजित करून सर्वोतोपरी नियोजन करावयाचे आहे.

0000000

 


अलमट्टीतून 1922 क्युसेक विसर्ग


 

          कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 155.21 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार अलमट्टी धरणातून 1922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील-  इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 51.79 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 88.758 इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 55.71 दलघमी, वारणा 641.49 दलघमी, दूधगंगा 475.50 दलघमी, कासारी 51.15  दलघमी, कडवी 39.86 दलघमी, कुंभी 51.82 दलघमी, पाटगाव 75.19 दलघमी, चिकोत्रा 22.74 दलघमी, चित्री 28.16 दलघमी, जंगमहट्टी 24.74 दलघमी, घटप्रभा  37.33 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 11.9 फूट, सुर्वे 13.2 फूट, रुई 40 फूट, इचलकरंजी 35 फूट, तेरवाड 34 फूट, शिरोळ 26 फूट, नृसिंहवाडी 21 फूट, राजापूर 10.6 फूट तर नजीकच्या सांगली 5 फूट व अंकली 4.7 फूट अशी आहे.

00000