इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ३० जुलै, २०२०

‘आम्ही इचलकरंजीकर अधिकारी’ च्यावतीने आयजीएममध्ये गरम पाण्याचे 10 डिस्पेन्सर


 

कोल्हापूर,दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : मूळ इचलकरंजी शहरवासी असलेले आणि राज्यभर कार्यरत असलेल्या अधिकारी वर्गाच्या आम्ही इचलकरंजीकर अधिकारी व्हॉटस् ॲप ग्रुपच्यावतीने आज इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयात गरम पाण्याचे 10 डिस्पेन्सर देण्यात आले. त्यामुळे रुग्णांना पिण्यासाठी गरम पाण्याची सोय झाली आहे.

        ग्रूपचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, शालेय पोषण अधीक्षक प्रवीण फाटक, नगर भू मापन अधिकारी शशिकांत पाटील यांनी या वस्तू आज वैद्यकीय अधिक्षक डॉ. रवींद्र शेटे यांच्याकडे सुपूर्द केल्या.

          दोन वर्षापासून हा ग्रुप काम करीत असून घोरपड़े नाट्यगृह येथे 1000 मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला होता.मागील महापुरातही या ग्रुपच्यावतीने 2 लाख रुपयांच्या विविध वस्तू पूरग्रस्तांना वाटल्या होत्या. चटाई, चादर, जीवनाश्यक वस्तू, महिलांना सॅनेट्री नॅपकीन अशा वस्तूंचा समावेश होता. गावातील युवा होतकरु मुलांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यावसायिक मार्गदर्शन करणे, राज्यभर विविध कार्यात शहरातील लोकांना प्रशासकीय सहकार्य करणे, शहराच्या विविध विकास कार्यात सहकार्य करणे असे काम या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे श्री. रसाळ यांनी सांगितले.

          मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या नेतृत्वात हा ग्रुप कार्यरत आहे. ग्रूपमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, मुख्याधिकारी, पोलिस अधिकारी, अशा विविध पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

00 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.