इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करा


                                                 

कोल्हापूर,दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी व 12 वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी उत्तीर्ण इ. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्य  सरासरी 60 पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पां. भ. गिऱ्हे यांनी केले आहे.

 सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इ. 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमासाठी विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) सामाजिक न्याय भवन येथे 416602 अथवा lasde.kolhapur.@gmail.com येथे आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी.

आवश्यक कागदपत्रे याप्रमाणे- उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना साध्या कागदावर फोटो लावून अर्ज (भ्रमणध्वनी नमुद करावा), जातीचा दाखल, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड (शिधापत्रिका) छायांकीत प्रत, आधारकार्ड, गुणपत्रक व पुढील वर्गात प्रवेशाबाबतचा पुरावा.

मातंग समाज व तत्सम 12 पोटजातील विद्यार्थ्यांनी अर्ज व कागदपत्रांच्या छायांकीत प्रती स्वयं साक्षांकित करुन दिनांक 10 ऑगस्ट 2020 पर्यंत कार्यालयीन पाठवावेत.

0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.