** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 3, 2012

लोकशाही दिन कार्यक्रमात ७६ अर्ज दाखल


     कोल्हापूर दि. २ : जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात विविध विभागांशी संबंधित एकूण ७६अर्ज दाखल झाले असून त्यापैकी सर्वांधिक ३७ अर्ज महसूल विभागाचे आहेत.

      आज दाखल झालेल्या ७६ अर्जापैकी १२ अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयाशी निगडीत आहेत. जिल्हा परिषदेशी निगडीत ९, उपनिबंधक कार्यालयाचे १२, अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे ३, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध  प्रशासन, अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग यांच्याशी निगडीत प्रत्येकी एक अर्ज दाखला झाला आहे. जून २०१२ अखेर दाखल झालेल्या एकूण १९३ अर्जापैकी  आजअखेर ९८ अर्ज अर्ज निकाली काढण्यात आले असून ९५ अर्ज प्रलंबित आहेत.


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.