कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणुकीचे मतदान दि. १२
एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. या दिवशी २७६
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही
सार्वजनिक सुट्टी २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे
मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू
राहील. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये,
निमशासकीय
कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बॅंका
इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी राहुल रेखावार यांनी कळविले आहे.
00 0
0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.