कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): अवैध सावकारीमुळे आर्थिक पिळवणूक अगर स्थावर मालमत्ता,
शेती, जमीन सावकाराने बळकाविली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयास
संपर्क साधण्याचे किंवा तक्रार अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक अमर
शिंदे यांनी केले आहे.
अनधिकृत सावकारी
व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या उद्येशाने तसेच सावकारी व्यवसायावर
योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम,2014
ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी जिल्हास्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत
करण्यात आलेली आहे. या समितीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे अध्यक्ष आहेत तर जिल्हा
पोलीस प्रमुख हे सदस्य आहेत, समितीचे सदस्य सचिव हे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था
हे आहेत.
00 0
0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.