कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, मुरगूड यांच्या संयुक्त विद्यमाने, मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज, मुरगूड येथे “पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे”
आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सं.कृ.माळी यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे 15 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 1800 पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्याकरिता कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 8 वी, 9 वी उत्तीर्णांसह, 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदवीकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.
तसेच स्वयंरोजगार करीता विविध महामंडळाकडील शासकीय कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार असल्याचेही श्री.
माळी यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.