कोल्हापूर,
दि. 9 (जिमाका): महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळामार्फत पोलीस अधीक्षक
कोल्हापूर यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या छत्रपती ताराराणी
पोलीस गृहसंकुल निवासी इमारतींचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
करण्यात आले.
यावेळी
उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जिल्ह्याचे
पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन
मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, सह पालकमंत्री तथा राज्यमंत्री
माधुरी मिसाळ, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे
कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, महापौर
रूपाराणी निकम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा,
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.
पोलीस
मुख्यालय परिसरात बांधण्यात आलेल्या या प्रकल्पात प्रत्येकी १०२ सदनिकांच्या १८ मजली
दोन इमारती अशा २०४ निवासस्थानांचा समावेश आहे. ७१ कोटी २८ लाख रुपये किंमतीचा हा प्रकल्प
असून एकूण बांधकाम क्षेत्र २४ हजार १०१ चौरस मीटर आहे. इमारतीच्या छतावर सौर विद्युत
प्रणाली उभारण्यात आली असून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अग्निशामक प्रणाली आदी समाविष्ट
आहेत.
0000



No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.