कोल्हापूर दि. ७; जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये कमी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ . विजय राठोड यांनी शाहूवाडी तालूक्यातील मौजे मोळावडे येथील शेतकरी श्री. रामचंद्र शिवाजी पाटील यांचे शेतावर भुईमूग पिकाची श्री. सयाजी शंकर पाटील यांचे शेतावर रताळी पिकाची पाहणी केली. मौजे ससेगाव या गावात श्री. गुंगा आनंदा पारळे , श्री.तानाजी महिपती पारळे श्री. केशव गुंडा पारळे या शेतकऱ्यांच्या शेतावर भात पिकाची पाहणी केली.
जिल्हाधिकारी यांनी मोळावडे व ससेगावातील उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून सध्य स्थितीतील पीक परिस्थिती संदर्भात चर्चा केली.
कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके वाळून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विजय राठोड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.
यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी डॉ. समीर शिंगटे, तालुका कृषि अधिकारी मा. निलम चाकणे , मंडळ कृषी अधिकारी संजय तांदळे , अशोक कोळेकर , सदर गावाचे सरपंच , पोलीस पाटील , शेतकरी , सहायक कृषी अधिकारी, तलाठी आदि. उपस्थित होते .
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.