कोल्हापूर,
दि. 22 : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी जिल्ह्यातील गडहिंग्लज
तालुक्यातील नेसरी येथील प्रतापराव गुजर स्मारकाच्या पवित्र मातीचे पूजन करण्यात
आले. पूजन केलेली पवित्र माती शिवस्मारकासाठी पंचायत समिती सदस्य सुनिल शिंत्रे,
ॲड. हेमंत कोलेकर यांनी मंडळ अधिकारी पी.एस.ऐसरे, पंचायत समिती विस्तार अधिकारी
श्री. ढाले यांच्याकडे सुपूर्त केली.
शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव
गुजरांच्या बलिदानाने पावन झालेल्या नेसरी भूमितील पवित्र मातीचे पूजन करण्यात आले. यावेळी स्मारक
समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर, कानडेवाडीच्या सरपंच अनिता देसाई, सावंतवाडी
तर्फे नेसरीच्या सरपंच नंदाताई नांदवडेकर, नेसरीच्या सरपंच वैशाली पाटील, संजय
शिंदे, रविराज कुपेकर, उपसरपंच दयानंद नाईक तसेच शिवप्रेमी, नागरीक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
0 0 0 0
0 0



No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.