कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): सन
२०२२-२३ या वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत
त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज तात्काळ सादर करावेत, असे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये
यांनी केले आहे.
शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या असल्याने चालू शैक्षणिक
वर्षांत वैधता प्रमाणपत्रा अभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये
यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला
नाही त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा व त्या अर्जाची प्रत आवश्यक
त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला
प्राप्त केला आहे त्याच जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे
विलंबाबाबतच्या हमीपत्रासह त्वरित सादर करावा. जात वैधता प्रमाणपत्राअभावी
विद्यार्थ्यास आरक्षणातून प्रवेश मिळाला नाही तर त्यास जात प्रमाणपत्र पडताळणी
समिती जबाबदार राहणार नाही असे हमीपत्र अर्जदाराने अर्जाच्या प्रतीसोबत जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. हमीपत्राचा नमुना बार्टीच्या
संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जात प्रमाणपत्र पडताळणी
समितीकडे हमीपत्राचा नमुना उपलब्ध आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.