** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, November 2, 2022

दुसऱ्या महायुध्दातील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करावेत

 

 

कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : जिल्ह्यातील दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले 15 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष किंवा ईमेल zswo_kolhapur@maharashtra.gov.in वर जमा करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा प्र.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.

लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले वर्षातून दोन वेळेस (मे/जून व नोव्हेंबर/डिसेंबर) या महिन्यात जमा करावेत. तसेच हयातीचे दाखले जमा झाल्याची खात्री करण्यासाठी 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.