कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : शिरोळ तहसिलदार कार्यालयातील
निर्लेखित वाहनाचा जाहीर लिलाव दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता
तहसिल कार्यालय, शिरोळ, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिरोळ येथे होणार आहे, अशी माहिती
इचलकरंजी विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली आहे.
(मॉडेल - महिंद्रा बोलेरो, वाहन क्र.
- MH-09-AG-0122, मेक- 2007 व अपसेट किंमत 75 हजार रुपये)
तहसिलदार शिरोळ यांच्या ताब्यात असलेले वाहन ‘आहे त्या
परिस्थितीत’ जाहीर लिलावाव्दारे विक्री करावयाचे असून लिलावाच्या सर्वसाधारण अटी व
शर्ती कार्यालयीन वेळेत(सुट्टीच्या दिवसा व्यतिरिक्त) उपविभागीय अधिकारी कार्यालय इचलकरंजी
व तहसिल कार्यालय शिरोळ यांच्या नोटीस बोर्डवर पहावयास मिळेल, असेही श्री. खरात यांनी
कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.