कोल्हापूर,
दि. 2 (जिमाका): शैक्षणिक वर्ष सन 2022-23 साठी महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे
अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. अनुसुचित जाती, विमुक्त जाती व
भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील
विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज महाडिबीटी पोर्टलवर दि.
5 नोव्हेंबर पर्यंत
सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले
आहे.
सामाजिक न्याय व विशेष व
सहाय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व
राज्य शासनाची मॅट्रीकोत्तर शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना,
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (इ.११वी व १२वी) व व्यावसायिक
अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना महाडिबीटी या
पोर्टलव्दारे ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.
महाविद्यालयांनी
विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीचे प्रमाण वाढण्याकरीता प्रयत्न कारावेत. तसेच नोंदणी
केलेले परिपूर्ण अर्ज सहायक आयुक्त कार्यालयास अग्रेशित करावेत. अद्यापही
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले सन 2019-20 ते 2021-22 या कालावधीतील
विद्यार्थ्यांचे अर्ज 5 नोव्हेंबर पर्यंत सहायक आयुक्त कार्यालयाकडे सादर करावेत,
असेही श्री. लोंढे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.