हिंद - दी - चादर श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांच्या शहीदी समागम
कार्यक्रमाच्या
अनुषंगाने आढावा बैठक संपन्न
25 फेब्रुवारी पर्यंत
निबंध व घोषवाक्य स्पर्धेसाठीचे साहित्य पाठवावे
कोल्हापूर दि. 16 : हिंद दी चादर अर्थात श्री गुरु
तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नवी मुंबई - खारघर या ठिकाणी 28 फेब्रुवारी
व 1 मार्च रोजी कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शीख , सिकलीकर
, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी आणि इतर समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी
व्हावे. तसेच विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घोषवाक्य
व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे उपसंचालक
(माहिती) प्रवीण टाके यांनी केले.
तिसऱ्या टप्प्यात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. उपसंचालक प्रवीण टाके यांनी ही बैठक आयोजित करण्यापाठीमागील भूमिका विशद केली.
तर जिल्हा
माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी निबंध व घोषवाक्य स्पर्धा आयोजनाबाबत माहिती दिली.
या शताब्दी वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने खुल्या व महाविद्यालयीन
अशा दोन गटांत निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी
आपले साहित्य २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत hinddichadarkolhapur@gmail.com या ई-मेलवर
पाठवावे. जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन
बैठकीत करण्यात आले.
०००००



No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.